हे चाललंय काय? एकाच रस्त्याचे दोन वेगवेगळ्या भागात जाडीकरण; बांधकाम कंपनीला PWDचा आशीर्वाद

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : मागील वर्षीपासून कन्हान ते अरोली रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम सुरू आहे. सुरवातीपासूनच या रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ताशेरे ओढल्या जात आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराने कोणतीही सुधारणा केल्याचे दिसून येत नाही. राज्य मार्गाचे बांधकाम म्हटले की एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत सिमेंटीकरणाची जाडी एकसारखी असणे गरजेचे असते. मात्र सदर रस्त्याचे जाडीकरण दोन वेगवेगळ्या भागात होत असल्याने शंकेला पेव फुटले आहे.

Nagpur
Mumbai : 'त्या' 734 इमारतींच्या पुर्नविकासासाठी म्हाडा मिशन मोडवर; लवकरच टेंडर

मौदा, पारशिवनी आणि रामटेक तालुक्यातील मिळून 104 किलोमीटरच्या सीमेंट रस्ता बांधकामाकरिता 405 कोटीचा निधी खर्च करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखित कन्हान ते अरोली रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामात मळणीपूर्वी खोदकामची माती, खोदलेला निकृष्ट दर्जाचा डांबर आणि मातिमिश्रित मुरूम वापरण्यात आला. लोकांच्या नजरेत पडू नये म्हणून त्यावर थोड्या प्रमाणात मुरूम टाकून बोरवण घालण्यात आली. त्याची पाणी टाकून मळणी (कॉम्पेक्षण) करणे गरजेचे असतांना थातूमातुर मळणी केल्याचा आरोप  नागरिकांनी त्यावेळी केला होता. दीर्घ काळापर्यंत रस्ते टिकावे याकरिता सीमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येते.  मात्र बांधकाम कंपनी आणि संबंधित विभागाचे अधिकारी आपसात साटेलोटे करीत असल्याने बांधकामाचा फज्जा होत आहे. रस्त्याच्या बांधकामाबाबत सोलिंग, जीएसबी, डब्लूएमएम, डीएलसी, पीक्यूसी, पीएलसी आदिसह तांत्रिक साहित्याचे प्रमाण आणि बांधकामाची गुणवत्ता याची गुणवत्ता नियंत्रण मंडळाने योग्य चौकशी करणे गरजेचे झाले आहे.

Nagpur
Nagpur : नागपुरातील आमदार निवास होणार हायटेक! 23 कोटी खर्चून आमदारांना देणार 5 Star सुविधा

सिमेंट रस्त्याची जाडी हि कन्हान ते तारसापर्यंत 280 एमएमची आणि तारसा ते अरोली पर्यंत केवळ 200 एमएमची करण्यात येत आहे. त्यामुळे जड वाहतूक तारसा ते अरोली मार्गे भंडारा किंवा तुमसरकडे जाणार नाही का ? असा सवाल निर्माण झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संदीप पचकावडे यांना विचारणा केली असता. बांधकाम सुरू होण्यापूर्वी सदर रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्या भागात जड वाहतुकीचा प्रभाव कमी अधिक राहणार आहे त्यानुसार रस्त्याची जाडी कमीअधिक ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. पण जड वाहतूक कोणत्या भागातून जाणार नाही याचा अंदाज संबंधित विभागाने आधीच कसा निश्चित केला असाही सवाल पुढे आला आहे. यामुळे येणाऱ्या काळात रस्त्याचे तिनतेरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nagpur
Nagpur : विकासकामांसाठी आता नागपूर मनपाला मिळणार सीएसआर निधीची साथ

सुरक्षा यंत्रणा नाही :

राज्य मार्गाचे बांधकाम करीत असतांना वाहतुकीचा खोळंबा आणि त्रासदायक होऊ नये याकरिता बॅरिकेट, सुरक्षक रक्षक, दिशानिर्देशित करणारे फलक, रेडियम आदीसह व्यवस्था करणे गरजेचे असते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बांधकाम कंपनीद्वारे सार्वजनिक हिताचा कसलाच विचार करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.  त्याचबरोबर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील त्यांना हेल्मेट, जॅकेट, शूज आदीचा वापर करणे गरजेचे असते. मात्र सदर बांधकामावर कसलीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत दिसून येत नाही. नियम धाब्यावर ठेवीत जणू मुजोरी करीत रस्त्याचे बांधकाम केल्या जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com