Solar Power
Solar PowerTendernama

वीज टंचाईमुळे ऊर्जामंत्र्यांच्या मतदारसंघात 'हा' प्रयोग

Published on

नागपूर (Nagpur) : विजेची टंंचाई दूर व्हावी आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर अधिकाधिक वाढावा यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात २३० जागांवर पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी चार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहेत.

Solar Power
प्रदूषण मोजणीचे तीनतेरा! चारपैकी एकाच यंत्राची आकडेवारी वेबसाईटवर

वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. औष्णिक विजेची निर्मिती करताना हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ होते. त्यातच तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सहन करावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आणि वापरावर राज्य शासनाच्यावतीने भर दिला जात आहे.

Solar Power
ई-व्हेईकल : मुंबईत २८ चार्जिंग स्टेशनचे टेंडर...

उत्तर नागपूरमधील बडी मशीद, बंदे नवाज चौक, ५ किलो वॅट क्षमतेच्या पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्पाची आस्थापना करण्यात आली. या प्रकल्पाची अंदाजित किंमत २.४५ लाख इतकी आहे. या प्रकल्पातून ६००० यूनिट वीज निर्मिती प्रतिवर्षी होणे अपेक्षित आहे. अबू बकर मदरसा टेका येथे ४ किलो वॅट क्षमतेच्या प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाची किंमत १.९५ लाख रुपये इतकी असून, येथून ४८०० युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे.

Solar Power
गडकरी म्हणाले 'जेएनपीटी'त 3,500 कोटीतून होणार नवीन...

याच पद्धतीने अशोक नगर ३ किलो वॅट, माता वेलांकनी ग्राटो चर्च जरीपटका येथे २ किलो वॅट विजेची निर्मिती केली जात आहे. छोट्‍या छोट्‍या प्रकल्पातून मोठ्‍या प्रमाणात वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे औष्णिक वीज प्रकल्पाचा भार कमी होईल आणि प्रदूषणाची पातळीसुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.

Tendernama
www.tendernama.com