नागपूरच्या MLA निवासाचा ठेकेदार कुणाचा बगलबच्चा;अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या आमदार निवासाची आवस्था म्हणजे फक्त एन्ट्रीला मेकअप आणि आत रुम खराब अशी आहे, जेवण खराब मिळत आहे, कुठे ड्रेनेज तुंबलय अशी परिस्थिती असताना आमदार निवासमध्ये स्वच्छतागृहात चहाचे कप आणि भांडी धुण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. करोडो रुपयांचे कॉंट्रॅक्ट घेतले असताना, हा कसला नालायकपणा सुरु आहे. कुठं हे पाप फेडतील ? हा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा बगलबच्चा आहे ? असा संतप्त सवाल करत याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.

Ajit Pawar
'कॅग'ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची नोटीस; कोविड काळातील खर्च...

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दोन वर्षाच्या खंडानंतर नागपूरमध्ये अधिवेशन सुरु आहे. राज्यभरातून आमदार या अधिवेशनासाठी आले आहेत. आमदार ज्या ठिकाणी थांबतात त्या आमदार निवासाची व्यवस्था म्हणजे फक्त एन्ट्रीला मेकअप आणि आत रुम एकदम खराब आहेत. या आमदार निवास मधील स्वच्छतागृहात चहाचे कप आणि भांडी धुतली जात आहेत. विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी याबाबतचा व्हिडीओ व्टीट केल्यामुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच अनेक माध्यमांनी सुध्दा याची दखल घेतली आहे. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे.

Ajit Pawar
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात 'MMRDA'ची 2700 कोटींची टेंडर

या व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपयांचे कॉट्रॅक्ट दिले जाते. तरीही असे गैरप्रकार सुरु आहेत. पोलीसांना सुध्दा पहिल्या दिवशी जेवण मिळाले नाही. ते किती तास ड्युटी करतात हे कोणाला माहित नाही. सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल करत याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करुन त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com