Nagpur : कधी होणार 'या' मार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज?

Ajni Railway Station
Ajni Railway StationTendernama

नागपूर (Nagpur) : मुंबई-नागपूर-हावडा रेल्वेमार्ग नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला छेदून गेल्याने या मार्गावरील कामठी आजनी दरम्यान रेल्वे फाटक आहे. या फाटकाजवळ होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरली असून, ती अपघातांना कारणीभूत ठरते आहे. ही समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी 'रेल्वे ओव्हरब्रिज' तयार करण्याची वारंवार मागणी केली जात असली तरी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज बांधणार कधी, असा प्रश्न वाहनचालकांसह कामठी व इतर तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.

Ajni Railway Station
Nashik : 'रामसेतू'वर होणार धनुष्य पूल; तर तपोवनात लक्ष्मण झुला

नागपूर- जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग दोन राज्यांना तसेच नागपूर जिल्ह्यातील कामठीसह पारशिवनी व रामटेक तालुक्याला जोडणार असल्याने या महामार्गावर 24 तास वाहनांची वर्दळ सुरू असते. मुंबई-नागपूर-हावडा हा रेल्वेमार्ग कामठी आजनी दरम्यान महामार्गाला छेदून गेला असल्याने तिथे रेल्वे प्रशासनाने फाटक तयार केले आहे. या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रवासी आणि मालगाड्यांची संख्या अधिक असून, राष्ट्रीय महामार्गावर देखील सतत रहदारी सुरू असते.

विशेष म्हणजे, ते फाटक दर 10 ते 15 मिनिटांनी बंद होत असून, ते किमान 20 ते 30  मिनिटे बंद असते. रेल्वे फाटक बंद झाल्यास फाटकाच्या दोन्ही बाजूला रोडलगत वाहनांच्या किमान अर्धा ते पाऊन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. फाटक उघडताच वाहतूककोंडी होते. या कोंडीमुळे अपघात व भांडणे होत असून, वाहन चालकांसह नागरिकांना किमान अर्धा ते पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागते.

Ajni Railway Station
Nashik : ओझरच्या HAL मध्ये Airbus विमानांच्या देखभाल दुरस्तीतून मिळणार 500 जणांना रोजगार

ही समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज तयार करणे अनिवार्य असताना रुग्णांसाठी धोकादायक रेल्वे फाटक बंद असल्यास ग्रामीण भागातील रुग्णांसह कामठी शहर, तालुक्यातील आजनी, वडोदा, गुमथळा, तसेच पारशिवनी तालुक्यातील कन्हानसह इतर गावे आणि रामटेक शहरातील तालुक्यातील काही गावांमधील शेतकरी व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही फाटक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने रेल्वे फाटक रुग्णांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरते आहे. रेल्वे प्रशासन व बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

आश्वासनाची पूर्तता कधी?

या फाटकाजवळील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन वर्षांपुर्वी निवेदन दिले होते.

नितीन गडकरी यांनी यासंदर्भात आपण रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिज तयार करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र, त्यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही, असेही नागरिकांनी सांगितले.

Ajni Railway Station
Pune Ring Road : रिंग रोडच्या पश्चिम भागातील भूसंपादनाबाबत मोठी अपडेट; लवकरच...

रुग्णांसाठी धोकादायक

रेल्वे फाटक बंद असल्यास ग्रामीण भागातील रुग्णांसह कामठी शहर, तालुक्यातील आजनी, वडोदा, गुमथळा, वडोदा तसेच पारशिवनी तालुक्यातील कन्हानसह इतर गावे आणि रामटेक शहरातील तालुक्यातील काही गावांमधील शेतकरी व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही फाटक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने रेल्वे फाटक रुग्णांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com