Nagpur: 2450 कोटी खर्च करून तयार करण्यात येतोय रेल्वेचा 'हा' मार्ग

Railway
RailwayTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर-इटारसी व वर्धा-बल्लारशाह मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच नागरिकांसाठी हा रेल्वे ट्रॅक बनून तयार होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते इटारसी आणि वर्धा ते बल्लारशाह दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या विलंबाला विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Railway
आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली : CM

मध्य रेल्वेच्या नागपूर ते दिल्ली आणि नागपूर ते चेन्नई या मार्गावर अप व डाऊन हे दोनच मार्ग आहेत. या दोन्ही मार्गावरील गाड्यांची वर्दळ लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने विभागात येणाऱ्या नागपूर-इटारसी आणि वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. सद्यःस्थितीत दोन्ही मार्गावरील काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागपूर से इटारसी 297 किलोमीटर अंतराचे तिसरा रेल्वे मार्ग 2 हजार 450 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे. तिगाव ते चिचोंडा 16.56 किलोमीटर आणि नरखेड ते कोहळी 50.26 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. तिगाव ते नरखेड 27.13 किलोमीटर आणि कोहळी ते कळमेश्वर 11.68 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असून लवकरच ते कार्यान्वित होणार आहे.

Railway
Nagpur : 'या' मोठ्या प्रस्तावाला फडणवीस यांनी दाखविला हिरवा झेंडा

बल्लारशाह मार्गावर 1,384.72 कोटी खर्च

वर्धा ते बल्लारशा या 132.64 किलोमीटर अंतराचे काम प्रगतीपथावर आहे. वर्धा ते हिंगणघाट 33.33 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. हिंगणघाट ते चिकणी रोडे 28.65 किलोमीटर आणि माजरी ते तडाली 19.33 किलोमीटर अंतराचे काम पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. चिकणी रोड ते माजरी 22.50 किलोमीटर आणि तडाली ते बल्लारशाह 28.53 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे मुंबई मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com