Nagpur : झोपलेल्या केंद्र सरकारला अखेर जाग; 291 कोटींच्या थकबाकीचे...

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath ShindeTendernama

नागपूर (Nagpur) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी थेट केंद्रीय ग्राम विकास मंत्री गिरीराज सिंग यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील मनेरगाच्या मजुरांची थकबाकी देण्यास सुरुवात झाली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्याची ही थकबाकी तब्बल साडेपाच कोटी रुपयांची आहे.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Nashik : ओझरच्या HAL मध्ये Airbus विमानांच्या देखभाल दुरस्तीतून मिळणार 500 जणांना रोजगार

रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच काँग्रेसचे नेते उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव यांनी या मुद्द्याकडे सर्वप्रथम लक्ष वेधले होते. त्यांनी कामगारांना थकबाकी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि बावनकुळे यांना निवेदन दिले होते. याची तत्काळ दखल घेण्यात आली. नऊ नोव्हेंबारपासून कामगारांना थकबाकी देण्यास सुरुवात झाली आहे. मजुरी न मिळाल्याने हजारो कामगारांना नवरात्र व दसरा साजरा करता आला नव्हता. त्यांची दिवाळी अडचणीत आली होती. मात्र राज्यातील या नेत्यांनी हालचाली केल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यादव यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेही या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दरम्यानची राज्याची 291 कोटी 50 लाख 83 हजार रुपयांची केंद्राकडे थकबाकी होती. नागपूर जिल्ह्याची थबाकीची रक्कम 5 कोटी 32 लाख तर रामटेक तालुक्याची सर्वाधिक 85 लाख 29 हजार रुपये होती.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Nashik : 'रामसेतू'वर होणार धनुष्य पूल; तर तपोवनात लक्ष्मण झुला

मनरेगा योजनेंत केंद्र व राज्य सरकारची हिस्सेदारी असते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने कामगारांच्या हाताला वर्षभर काम मिळावे याकरिता 2009 सालापासून ही योजना सुरू केली. त्यानंतर प्रथमच कामगारांची थकबाकी देण्यात आली नव्हती.

नागपूर जिल्हा मजूरी थकबाकी : 

 रामटेक : 85.29 लाख

 पारशिवनी : 51.24 लाख

 भिवापूर : 14.65 लाख

 हिंगणा : 21.00 लाख

 कळमेश्वर: 2.58 लाख

 कामठी : 39.10 लाख

 काटोल : 38.18 लाख

 कुही : 61.42 लाख

 मौदा : 60.63 लाख

 नागपूर (ग्रामीण): 15.16

 नरखेड : 14.12 लाख

 सावनेर : 38.76 लाख

 उमरेड : 19.87 लाख

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com