Nagpur : 'या' कंपनीमुळे रखडली वातानुकूलित E-Bus खरेदी; महापालिका काय कारवाई करणार?

Electric bus
Electric busTendernaam

नागपूर (Nagpur) : ऑगस्ट अखेरपर्यंत 24 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस (AC E Bus) देण्यात असमर्थ ठरलेल्या पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीला महापालिकेने नोटीस बजावली आहे. या कंपनीने आतापर्यंत केवळ दहा इलेक्ट्रिक बस महापालिकेला दिल्या. डिसेंबरपर्यंत 144 बस उपलब्ध करून देण्याचा करार आहे. परंतु ऑगस्टअखेर 24 ई बस देण्यात अपयशी ठरल्याने डिसेंबरअखेर 144 ई-बस मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Electric bus
Nashik : महापालिकेचा सिंहस्थ पूर्व आराखडा बुधवारी होणार तयार

मागील वर्षी पंधराव्या वित्त आयोगाने इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी 72 कोटींचा निधी दिला. त्यानंतर महापालिकेने पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीला 144 वातानुकूलित ई-बससाठी आदेश दिला. 144 बस उपलब्ध करून देणे तसेच त्याची देखभालीसह कंपनीला वाठोडा येथे चार्जिंग डेपोही उभा करायचा आहे. चार्जिंग डेपोचे काम संथगतीने सुरू आहे.

त्यातच कंपनी ऑगस्ट अखेरपर्यंत 24 वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस देण्यातही अपयशी ठरली. त्यामुळे महापालिकेने या कंपनीला नोटीस बजावली. कंपनीने सप्टेंबरमध्ये 24 बस उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली असल्याचे परिवहन विभागातील सूत्राने नमूद केले.

Electric bus
Nagpur : नागपूर शहरापासून 80 किमीवर उभे राहतेय एक नवे आश्चर्य! लवकरच उद्घाटन

कंपनीला या वर्षाच्या डिसेंबरअखेर सर्व 144 बस महापालिकेला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. पहिल्या टप्प्यात 24 बस देण्यात कंपनी अपयशी ठरल्याने डिसेंबरपर्यंत संपूर्ण 144 बस मिळण्याबाबत मनपातील अधिकारीही साशंक आहे. सध्या शहरात 388 बस धावत दररोज 80 हजार किमी धावत आहे. दररोज सव्वा लाख प्रवासी महापालिकेच्या आपली बसचा वापर करीत आहेत.

...तर कंपनीला दंड

कंपनीने आता 24 बसेस सप्टेंबरअखेर देण्याची ग्वाही दिली आहे. कंपनी डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरल्यास महापालिका दंड आकारणार असल्याचे मनपातील सूत्राने नमूद केले. महापालिका व पीएमआय कंपनीत झालेल्या करारामध्ये विलंब झाल्यास दंडाचीही तरतूद आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com