Nagpur News : नागपुरात का वाढली भटक्या जनावरांची संख्या? आता 104 कोटींच्या 'या' प्रकल्पाचे लवकरच टेंडर

Nagpur City
Nagpur CityTendernama

Nagpur News नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यांवरील भटक्या गुरांचा धोका संपवण्यासाठी राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेच्या महत्वकांक्षी नंदग्राम गोठा प्रकल्पासाठी 104 कोटी निधी दिला आहे. या प्रकल्पांतर्गत, नागरी संस्था गुरांचे गोठे शहराच्या हद्दीबाहेर बनविण्यात येणार आहे. 

Nagpur City
मुंबईतील 5000 कोटींची जमीन ‘अदानीं’च्या घशात घालण्याचा घाट; विजय कुंभार यांचा खळबळजनक आरोप

या प्रकल्पांतर्गत भांडेवाडी डम्पिंग यार्डजवळील वाठोडा येथे 19 हेक्टर म्हणजे 44-45 एकर जागेवर गोठ्याचे शेड बनविले जातील. या शेड मध्ये कमीतकमी 1100 ते 1200 जनावरे राहू शकतील. 

मूलभूत कामांसाठी काढले जाणार टेंडर

नंदग्राम प्रकल्प अंतर्गत जनावरासांठी शेड बनविले जाणार आहेत. पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, रस्ते, गटार लाईन, विद्युत व्यवस्था, दूध डेयरी, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. या सर्वांसाठी लहान-मोठे टेंडर जून महिन्याच्या शेवटी काढण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात 1046 गोठे आहेत. डेअरी डेव्हलपमेंट विभागाच्या आकडेवारीनुसार गुरांची संख्या 3,500 एवढी आहे, परंतु दिवसेंदिवस गुरांची संख्या वाढत चालली आहे.

Nagpur City
MahaRERA News : महारेराचा बिल्डरांना हाय व्होल्टेज शॉक! राज्यातील 'त्या' 1750 गृहप्रकल्पांची नोंदणी का केली रद्द?

भटक्या गुरांचा त्रास कमी करण्यात हे प्रकल्प यशस्वी झाल्यास, नागपुरातील इतर परिसरात महापालिका असा आणखी एक गोठा बांधणार आहे. श्याम वर्धने महापालिका आयुक्त असताना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने 2013 मध्ये या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला होता. 2012 मध्ये डॉ. महल्ले यांनी गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी भेट दिली होती.

प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यास झालेल्या विलंबामुळे सुरुवातीला प्रस्तावित असलेला 25 कोटींचा खर्च तिप्पटीने वाढला असून, आता हा प्रकल्प 104 कोटींवर पोहोचला आहे.

2020-21 पासून 30 जून 2023 पर्यंत, महापालिकेने रस्त्यावर भटक्या 2,371 गुरे जप्त केली आहेत आणि मालकांकडून 18.18 लाख रुपये दंड वसूल केला आहे. तर रस्त्यावरील भटकी जनावरे जप्त केल्याची आकडेवारी आणखी वाढली असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यानी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com