MahaRERA News : महारेराचा बिल्डरांना हाय व्होल्टेज शॉक! राज्यातील 'त्या' 1750 गृहप्रकल्पांची नोंदणी का केली रद्द?

maharera
maharera Tendernama

MahaRERA Mumbai News मुंबई : गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण न करता लटकवून ठेवणाऱ्या विकासकांना (Developers - Builders) महारेराने (MahaRERA) जोरदार दणका दिला आहे.

maharera
मुंबईतील 5000 कोटींची जमीन ‘अदानीं’च्या घशात घालण्याचा घाट; विजय कुंभार यांचा खळबळजनक आरोप

प्रकल्प ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण न करणे, झालेल्या विलंबाबाबत रेरा प्राधिकरणाला माहिती न देणे, परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू न केल्याचा ठपका ठेवत तब्बल १७५० प्रकल्पांची नोंदणी रद्द केली आहे. तर ११३७ प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये मुंबई शहर, उपनगरसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील ७६१ प्रकल्पांचा समावेश आहे.

महारेराने नोंदणी रद्द केलेल्या गृह प्रकल्पात म्हाडाच्या सिद्धार्थ नगर गोरेगाव, कोपरी पोवई, टागोरनगर विक्रोळी या तीन प्रकल्पांचा देखील समावेश आहे.

maharera
Wardha News : तुम्हाला उद्योजक व्हायचंय, मग अर्ज कराच!

सर्वसामान्य घर खरेदीदारांना वेळेत घराचा ताबा मिळावा, विकासकांच्या मनमनीला चाप लागावा म्हणून महारेराने प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार दर तीन महिन्याला प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल रेरा प्राधिकरणाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे रेराकडे नोंदणी केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन ग्राहकांना ठरलेल्या मुदतीत घराचा ताबा मिळण्यास मदत होत आहे. पण अनेक विकासकांनी अनेक महिने प्रकल्प लटकवून ठेवले असून त्याची कारणेही रेराकडे सादर केली नाहीत. तसेच प्रकल्पाला मुदतवाढ मिळावी म्हणून प्रक्रियाही सुरू केलेली नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द केली आहे.

ग्राहकांनी या प्रकल्पांत गुंतवणूक करताना काळजी घ्यावी असे आवाहन महारेराच्यावतीने करण्यात आले असून या प्रकल्पांची यादी रेराच्या संकेतस्थळावर टाकली आहे.

maharera
Electoral Bonds : वादग्रस्त स्मार्ट मीटर्सच्या टेंडरमध्येही 'चंदा दो, धंदा लो'! 2 कंपन्याकडून इलेक्टोरल बॉण्डद्वारे 85 कोटी

महारेरा नोंदणी रद्द केलेल्या प्रकल्पांचे बँक खाते सील केले जाते. तसेच संबंधित प्रकल्पाची जाहिरात, पणन त्यातील सदनिकांची विक्री, नोंदणी करता येत नाही. त्यावर रेरा पदाधिकरणाकडून बंदी घातली जाते.

राज्यातील एकूण प्रकल्पांचा आढावा घेऊन अशा प्रकारच्या लटकलेल्या ६६३८ प्रकल्पांना ३० दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यापैकी ३७५१ प्रकल्पांतील काहींनी प्रकल्प पूर्णतेचे प्रपत्र ४ महारेरा संकेतस्थळावर अद्ययावत केले, काहींनी महारेरा नोंदणीच्या नुतनीकरणासाठी अर्ज केले, तर काहींनी प्रकल्पात नोंदणीपासूनच काही हालचाल नसल्याने प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केले.

maharera
मुंबई ते सिंधुदुर्ग हायवे : कुंडलिका, जयगड खाडीपुलांचे टेंडर 'अशोका बिल्डकॉन'लाच; 2150 कोटींचे बजेट

घरखरेदीत गुंतवणूक करणारा कुठलाही ग्राहक, कुठल्याही प्रकारे फसवला जाऊ नये, यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रकल्प सुरू होण्यापासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाच्या विकासकाला प्रकल्पाची जी आणि जेवढी माहिती उपलब्ध असते ती सर्व माहिती घर खरेदीदारालाही असायला हवी यासाठीच महारेरा विविध विनियामक तरतुदींच्या आधारे, विविध पातळ्यांवर या क्षेत्राचे सूक्ष्म नियंत्रण करीत आहे.
- अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा

maharera
Mumbai : Good News! मुंबईकरांचा वेळ वाचणार; सव्वा सहा किमीच्या 'त्या' बोगद्याचे...

नोंदणी रद्द केलेले प्रकल्प...
मुंबई शहर - ४८
मुंबई उपनगर - ११५
ठाणे - १८२
पालघर- ९९
रायगड-  २१६
रत्नागिरी - ७७
सिंधुदुर्ग -२३
पुणे - ६२८
उत्तर महाराष्ट्र - १३५
विदर्भ - ११०
मराठवाडा - १००
दादरा नगर हवेली - १३
दमन - ३

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com