नागपूर महापालिका 2024-25 या वर्षात करणार 'ही' विकासकार्य

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प मनपा प्रशासक व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मांडला. त्यात त्यांनी अनेक विकास कार्य पूर्ण करण्याचे आश्वासित केले. सोबतच रखडलेले विकासकार्य या वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

Nagpur
Mumbai : अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल! शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधक का संतापले?

अशाप्रकारे सुरु होणार नवीन प्रकल्प आणि विकासकार्य : 

पाणी दरापासून रु. 250 कोटी उत्पन्न प्रस्तावित

नगर रचना विभागाकडुन रु. 339 कोटी उत्पन्न अपेक्षित

सरकारकडून 2295 कोटी अनुदान

वर्ष 2024-25 मध्ये एकुण महसुली खर्च रु. 2016.87 कोटी व भांडवली खर्च रु. 3348.48 कोटी अपेक्षित

भांडेवाडी येथे घनकच-यावर प्रक्रिया करून त्याची वैज्ञानिकरित्या विल्हेवाट लावण्याकरिता एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी होणार

 मृत जनावरांच्या विल्हेवाटीकरिता ‘इन्सिनेरेटर’ प्रकल्प उभारणार, या प्रकल्पासाठी 9 कोटींची तरतूद

 मनपाच्या मालमत्तापैकी मनपा अभिन्यासातील काही अभिन्यास सन 1910 पासून भाडेपट्टयावर दिलेले असुन सदर अभिन्यासातील अभिलेख जिर्ण अवस्थेत झाला असुन त्यांचे अभिलेखाचे स्कॅनिंग करणे.

नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्तांचा डाटा बँक तयार करणे.

मालमत्तांचा जिओ मॅपिंग, जिओ टॅगिंग, जिओ फेन्सिंग इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानद्वारे कामे करणे 

मनपाच्या जागेबाबत संपूर्ण अभिलेख संगणीकृत करून अद्यावत करणे.

भाडेपट्टयावर दिलेल्या भाडेपट्टा धारकांना सुलभ सुविधा व सेवा पुरविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने विविध कार्य प्रणाली तयार करणे.

दुर्बल घटक/झोपडपट्टीमध्ये राहणा-या मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांकरिता 50.73 कोटीची तरतूद

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 7 नवीन आकांक्षी सार्वजनिक शौचालयांची निर्मिती होणार, याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून 5.99 कोटीची तरतूद

वाठोडा व भांडेवाडी परिक्षेत्रात निर्माण होणा-या नंदग्राम प्रकल्पासाठी 104 कोटी प्राप्त

गोरेवाडा, लकडगंज कच्छी विसा मैदान आणि पोलिस लाईन टाकळी तलाव परिसरात मूर्ती विसर्जन कुंड तयार करण्यासाठी 30.27 कोटीची तरतूद

जिजाऊ स्मृती शोध संस्थान प्रकल्पासाठी 36.39 कोटीचे सुधारित प्राकलन

बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शिक्षण, कला आणि सांस्कृतिक केंद्र महाल येथे साकारणार, यासाठी 26.02 कोटी प्राप्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बटरफ्लाय उद्यान, बरबटे उद्यान लकडगंज येथे कॅकटस उद्यान व डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक पार्क उद्यानाचे नूतनीकरण

15 ठिकाणच्या सिमेंट रस्त्यांवरील दुभाजकांवर सौंदर्यीकरण, रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरण, 18 मुख्य रस्त्यावरील नाल्यालगत व्हर्टिकल गार्डनची निर्मिती     

विद्युत विभागातर्फे शहर सौंदर्यीकरणासाठी 15 कोटीचे विविध प्रकल्प कार्यान्वित होणार

औषधी भांडरच्या नवीन इमारतीचे बांधकाम व मिनीमाता नगर हॉस्पीटलचे बांधकामाकरिता 5 कोटीची तरतूद

दिव्यांग कल्याण योजनांसाठी 8 कोटीची भरीव तरतूद

बाजीराव साखरे ई-ग्रंथालय परिसरात किड्स लायब्ररी व मोमिनपुरा मुस्लीम लायब्ररीच्या जागेवर अत्याधुनिक ई-लायब्ररी करिता 10.75 कोटी प्रस्तावित

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com