Nagpur : 'असे' असणार सर्वसुविधायुक्त स्मार्ट टॉयलेट

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकातर्फे सक्करदरा येथील बुधवार बाजार संकुलातील स्वच्छतागृहाचा कायापालट करून पालिकेने स्मार्ट वॉशरूम बनवले आहे. हनुमाननगर झोन अंतर्गत बुधवार बाजारातील ‘स्मार्ट’ स्वच्छता गृहाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, शहरात आणखी स्मार्ट स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने 7 स्मार्ट स्वच्छतागृहांचा डीपीआर सरकारकडे पाठविला आहे.

Nagpur
Thane महापालिकेचा ठेकेदारांना दणका; नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी...

सेन्सरयुक्त प्रवेशद्वार

महिलांच्या सोयीसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हील चेअर, महिलांसाठी सॅनिटरी पॅड वॉशिंग मशिन, सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, हँड ड्रायर अशा अनेक सुविधांनी सज्ज असलेले 'स्मार्ट वॉशरूम' सुरू करण्यात आले आहे. वॉशरूममध्ये सेन्सर्सवर आधारित स्मार्ट एंट्री गेट आहे. ते उघडन्याची किंवा बंद करण्याची गरज नाही. वॉशरूममधील सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनमध्ये 5 रुपयांचे नाणे टाकून पॅड दिले जाईल. वापरलेले पॅड नष्ट करण्यासाठी तेथे सॅनिटरी पॅड इन्सिनरेटरही बसवण्यात आला आहे. महिलांसाठी हँड, ड्रायर, वॉश बेसिनची सोय करण्यात आली आहे. पुरुषांच्या वॉशरूममध्ये चार शौचालये, कमोड आणि साधी शौचालये आणि स्नानगृहे आहेत. दिव्यांगांसाठी स्वतंत्र कमोड टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. अपंगांसाठी वॉशरूममध्ये व्हील चेअरची व्यवस्था आहे. संपूर्ण परिसर स्वच्छतेसह सुंदर करण्यासाठी प्रवेशद्वारावर झाडे लावण्यात आली आहेत. 

Nagpur
बोरीवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या टेंडरसाठी L&T आणि 'मेघा'त स्पर्धा

सक्करदरा येथील बुधवार बाजार आवारातील म्युनिसिपल स्मार्ट सॅनिटेशन हाऊसमध्ये शुल्क निश्चित, मुतारी मोफत, मुतारीचा वापर मोफत होणार आहे. शौचालय वापरण्यासाठी 7 रुपये, साध्या पाण्याने आंघोळीसाठी 20 रुपये आणि गरम पाण्याने आंघोळीसाठी 30 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शहरात एकूण चार स्मार्ट शौचालये तयार करण्यात आली आहेत. यातून गोकुळपेठ व बुधवार बाजार येथील स्वच्छतागृहे नागरिकांच्या सोयीसाठी खुली करण्यात आली आहेत.

Nagpur
Nashik : झेडपीचा अजब कारभार; नगर जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराला...

7 स्वच्छतागृहांचा प्रस्ताव

शहरात अधिकाधिक स्मार्ट शौचालये बांधण्यासाठी महापालिकेने 7 स्मार्ट स्वच्छतागृहांचा डीपीआर सरकारकडे पाठविला आहे. 7 ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या स्मार्ट वॉशरूममध्ये एकूण 84 शौचालये, 25 स्नानगृहे, 79 मुतारी, 7 हिरकणी खोल्या, 7 केअर वर्कर्स रूम आणि 14 दुकाने प्रस्तावित आहेत. फुटाळा मानकापूर, मंगळवारी बाजार, रहाटे कॉलनी चौकातील गोरक्षण सभेजवळ, पारडी दहन घाटाजवळ, गांधीबाग कापड बाजार आणि सतरंजीपुरा येथील जुने महानगरपालिका कार्यालय या 7 ठिकाणी प्रस्तावित स्मार्ट स्वच्छतेगृहासाठी 599.07 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे  खर्चाच्या 25 टक्के म्हणजे 149.77 लाख रुपये केंद्र सरकार, 35 टक्के म्हणजे 209.68 लाख रुपये राज्य सरकार आणि उर्वरित 40 टक्के म्हणजे 239.62 लाख रुपये महानगरपालिका करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com