नागपूरमध्ये १७ इलेक्ट्रिक बस पण चार्जिंगस्टेशन फक्त एकच

bus
busTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) ताफ्यात १७ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. असे असले तरी चार्जिंग स्टेशन एकच असून तेथे फक्त सहा पॉईंट आहेत. त्यामुळे एकाच दिवशी सर्व बस कशा चार्ज करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

bus
शिंदे-फडणवीसांच्या 'त्या' आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; अद्याप यादी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहराला १७ इलेक्ट्रिक बस मिळाल्या. या बसचे काल, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहराला १७ बस मिळाल्या असल्या बुधवारपासून केवळ एकच बस सुरू करण्यात आली. मोरभवन ते श्रीकृष्णनगरपर्यंत या मार्गावर ही बस सुरू करण्यात आली. येत्या काही दिवसांत पाटणसावंगी, बुटीबोरी, बहादुरा, पिपळा फाटा, कन्हानपर्यंत या बस धावणार आहेत. या बसच्या तिकिटासाठी नागरिकांना कार्डचा वापर करावा लागणार आहे. सध्या एकाच बससाठी ही सुविधा करण्यात आली आहे. या बसमधून प्रवासासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. बसमध्ये वाहक राहणार नाही. डिजिटल कॅशने व्यवहार होणार आहे. नागरिकांना कार्ड देण्यात येणार असून ते रिचार्ज करावे लागणार आहे. बसमध्ये चढताना ॲपमध्ये कार्ड टॉप इन करावे लागणार आहे. जिथपर्यंत ज्यायचे आहे, तिथपर्यंतच्या तिकिटचे पैसे यातून कमी होईल. सर्वच बसमध्ये हे ॲप राहील.

bus
नागपूर जिल्हा बँकेच्या १५० कोटींची चौकशीत अडकणार का माजीमंत्री?

नागरिकांना कार्ड देण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. त्या प्रक्रियेला नागपूरकर कसा प्रतिसाद देतात, यावरच इलेक्ट्रिक बसचे भवितव्य ठरणार आहे. याशिवाय सद्यस्थितीत इलेक्ट्रिक बस चार्जिंगसाठी एकच वर्धमाननगर येथील एकच केंद्र आहे. येथे सहा चार्जिंग पॉईंट आहेत. एकदा बस चार्जिंग केल्यानंतर दोनशे किमीपर्यंत धावते. एका बसला चार्जिंगसाठी दोन तासांचा अवधी लागतो. १७ बससाठी चार्जिंग स्टेशन पुरेसे असले तरी ते एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वर्धमाननगरवरून चार्जिंग होऊन शहराच्या इतर भागात जाण्यासाठी या बसला मोरभवन येथे यावे लागणार आहे. यातच अधिक वेळ जाणार आहे. पंतप्रधान योजनेतून १४५ बस आणखी मिळणार आहे. वाडी येथे तसेच वाठोडा येथे १८ एकरात चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com