Nagpur: GMC मधील कॅन्सर रुग्णालयाच्या भूमीपूजनाला मुहूर्त मिळाला

government medical college nagpur
government medical college nagpurTendernama

नागपूर (Nagpur) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (GMCH) अंतर्गत 100 खाटांच्या कॅन्सर रुग्णालयाचे (Cancer Hospital) भूमीपूजन या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

government medical college nagpur
Nashik : सिंहस्थापूर्वी होणार चार हजार कोटींचे भूसंपादन

सर्व प्रशासकीय कामे पूर्ण झाली आहेत. टीबी वॉर्ड परिसरात बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने यापूर्वीच 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जीएमसीएचचे डीन डॉ. राज गजभिये यांनी या माहितीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, प्रकल्पाची देखभाल नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (NIT) करत आहे. 76 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सर्व बाबी अंतिम करण्यात आल्या आहेत. कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांसह हे केंद्र G+2 मजले अशी इमारत असेल.

जीएमसीने आधीच मुख्य उपकरणे - लिनियर एक्सीलरेटर खरेदी केली आहे. कॅन्सरची वाढती प्रकरणे आणि महागड्या उपचारांमुळे गरीब लोकांना खूप त्रास होत होता. जीएमसी मध्ये खऱ्यारुपाने कॅन्सर रुग्णालयाची खूप गरज होती. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी याआधीच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर रुग्णालय बांधण्याचे निर्देश दिले होते. आमदार प्रवीण दटके यांनी पाठपुरावा केला होता.

government medical college nagpur
Virar-Alibaug Corridor : पहिल्या टप्प्यात 1062 हेक्टर भूसंपादन

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रेडिओथेरपी विभाग कार्यरत आहे. कॅन्सर उपचारासाठी अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विभाग अद्ययावत करण्यात येणार असून, आवश्यक बांधकामासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. लवकरच सर्व उपकरणे खरेदी करण्यात येणार असून पुढील दीड वर्षात रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

एनआयटीचे अध्यक्ष डॉ. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, हा प्रकल्प एनआयटीला जबाबदारीसह देण्यात आला होता. प्रकल्पाचे सर्व आराखडे तयार आहेत आणि आम्ही ते एका वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात भूमीपूजन केले जाईल आणि अत्याधुनिक इमारत लवकरच तयार होईल. हा प्रकल्प टीबी वॉर्ड परिसरात विकसित केला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com