Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Mayo Hospital Nagpur (IGGMCH)Tendernama

Mayo: 'मेयो'त औषधांचा काळाबाजार; बड्यांचा सहभाग? कारवाईचे काय?

नागपूर (Nagpur) : मेयो (Mayo) अर्थात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अवैध औषध विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णांसाठी देवदूत असणारे सरकारी डॉक्टरच दोन दलालांसोबत मिळून अवैध औषध विक्री करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नागपूरच्या पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल करत त्या दोन दलालांना अटक केली खरी मात्र काही तासांतच त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, 15 फेब्रूवारी 2023 ला नागपूर जिल्हा केमिस्ट एॅंड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे मेयो रुग्णालय परिसरात स्टिंग ऑपरेशन करून अवैध रूपाने सुरू औषधांच्या विक्रीचा व्हीडिओ बनविल्यात आल्यानंतर हा काळाबाजार समोर आला. परंतु, एफडीए आणि पोलिसांकडून मात्र नाममात्र कारवाई करण्यात आली.

औषधांचा काळाबाजार सुरू असल्याने गरीब रुग्णांवर होत असलेला अन्याय बघून ‘अन्याय निवारण समिती'च्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, मेयोमध्ये प्रिस्क्रिप्शन व्यतिरिक्त बेकायदेशीर औषधे रुग्णांना विकली जातात. दलालांच्या माध्यमातून रुग्णांच्या कुटुंबांची खुलेआम लूट केली जात आहे. वैद्यकीय कायद्याचे उल्लंघन होत आहे. 77 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्स मध्येच अवैध औषध विक्री सुरू आहे.

Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Sambhajinagar : जीव्हीपीआरचा हलगर्जीपणा; अपघाताचा नवा ब्लॅकस्पाॅट

मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये एका औषध विक्रेत्याने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून अवैध औषध विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर औषध विकताना दोघांना अटक केली. त्यावरून नागपूर जिल्हा औषध विक्रेता संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत धोटे यांनी ही भूमिका मांडली.

विशेष तपासणी आवश्यक

नागपूर जिल्हा औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन ज्वाला धोटे म्हणाल्या की, गरिबांची लूट करणाऱ्या अशा प्रकरणांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे. यामध्ये डॉक्टर आणि परिचारिकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. औषध विक्रेते संघटनेच्या जिल्हा सचिव हेतल ठक्कर यांनी या प्रकरणामध्ये अन्य बड्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याची माहिती दिली. हे टाळण्यासाठी विशेष तपासणी करणे आवश्यक आहे.

नागपूर मेयो कॅम्पसमध्ये चुकीच्या पद्धतीने औषधांची विक्री केल्याप्रकरणी तपास समितीवर संशय असल्याने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली नवीन तपास समिती स्थापन करण्याची आणि या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करण्याची मागणी धोटे यांनी केली आहे.

Mayo Hospital Nagpur (IGGMCH)
Airport : 14 वर्षे झाली; यवतमाळवासीयांचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

मोठी टोळी सक्रिय

मेयोतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग असून, यासाठी टोळीचे लोक अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. या टोळीने गरीब आणि गरजूंकडून कोट्यवधी रुपये लुटल्याचा आरोपही धोटे यांनी केला आहे.

मेयोचे डीन डॉ. बिजवे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र, या तपास समितीत छोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप लावला जात आहे. समितीत मेयोशी संबंधित अधिकारी असल्याने ते आपल्या विभागातील दोषी अधिकारी - कर्मचाऱ्यांना वाचवू शकतात, त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येणार नाही. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश, सेवानिवृत्त डीन, निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांची नवीन चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी धोटे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com