Nagpur : 23 कोटींतून उपराजधानीला मिळणार 44 स्मार्ट पब्लिक टॉयलेट; वॉकर स्ट्रीटवरही...

Smart Toilets
Smart ToiletsTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व जिल्हा नियोजन समिती नागपूर यांच्या सहकार्याने सिव्हिल लाइन्स येथील वॉकर स्ट्रीट येथे स्मार्ट पब्लिक टॉयलेट उभारण्यात येणार आहे. या स्मार्ट पब्लिक टॉयलेटच्या बांधकामाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. 

Smart Toilets
Malegaon : मालेगाव महापालिकेचे घंटागाडीचे 75 कोटींचे टेंडर का सापडले वादात?

वॉकर स्ट्रीट वर बांधण्यात येणाऱ्या स्मार्ट पब्लिक टॉयलेट करिता 41 लक्ष रुपये निधी प्रस्तावित आहे. या स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, लघुशंकेची व्यवस्था असणार आहे. याशिवाय महिलांसाठी चेंजिंग रूम, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच डिस्ट्रॉय मशीन, हँड ड्रायर, सेन्सर प्रणालीयुक्त दरवाजे आदी सुविधा असणार आहेत.

स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये लघुशंका नि:शुल्क असेल. दिव्यांगांकरिता स्वच्छतागृहामध्ये व्हिल चेअरची व्यवस्था असेल. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर हिरवळ असेल. स्मार्ट पब्लिक टॉयलेटची योग्य देखरेख व्हावी याकरिता मनपाद्वारे स्वच्छतागृहाच्या वरच्या भागात देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी खोली तयार करण्यात येणार आहे.

Smart Toilets
Online Exam Scam : परीक्षा केंद्र चालकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच मॅनेज झालेत का?

नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे 44 नवीन स्मार्ट पब्लिक टॉयलेट निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 22.90 कोटी रुपये निधी प्रस्तावित असून याचे कार्यादेश देखील झालेले आहेत. नागपूर शहरात विधानसभानिहाय गरज असलेल्या, गर्दीच्या, बाजार परिसराच्या ठिकाणी हे स्मार्ट पब्लिक टॉयलेट बनविण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाच्या कार्यात कुठलेही अडथळे येऊ नयेत या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो अशा सर्व प्राधिकारणांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com