Nagpur : भ्रष्ट अधिकाऱ्यांना 'मनसे' देणार चोप; 'NIT'च्या विरोधात मोर्चा

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : नागपुरच्या एनआयटी कार्यालयातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत तसेच नागरिकांना तात्काळ न्याय मिळण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिशॉप कॉटन शाळेपासून एनआयटीपर्यंत एनआयटी अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक पुतळे बनवून मोर्चा काढला.

Nagpur
Nagpur : 2 वर्षांपुर्वीच मंजुरी मिळूनही 48 कोटींची पाणीपुरवठा योजना का रखडली?

या मोर्चात मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे सहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोर्चा एनआयटी कार्यालयवर जाऊन धड़कला. मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी कार्यक्षेत्रात येणाऱ्या विभागामध्ये अनेक निवेदने दिलीत. त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही. मनसे नेते राजू उम्बरकर या आंदोलन दरम्यान म्हणाले की, एनआयटी चेअरमन मनोज सूर्यवंशी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आम्हाला मिळाली. त्यावेळी आम्ही संयम राखला नाही तर तोडफोड केली असती. जर आमच्या मगण्या पूर्ण नाही केल्या तर मनसे त्यांना चांगला धड़ा शिकवेल अशी खुली धमकी त्यांनी दिली.

Nagpur
Mumbai : तब्बल 1,100 कोटी खर्चून सरकार बांधणार 'या' 7 इमारती

मनसेच्या मागण्या - 

वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणकारी ऐवजी पैसे घेऊन चुकीचा वास्तव्य अहवाल देऊन वाटप केलेले भूखंड रद्द करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणकारी नागरिकांना भूखंड वाटप करण्यात यावे. 20 ते अधिक वर्ष कालावधीपासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणकारींना नागपुर सुधार प्रन्यासतर्फे मंजूर केलेल्या ठरावाच्या अधीन राहून भूखंड तात्काळ वाटप करण्यात यावी. प्रशासनिक अधिकाऱ्यांमार्फत चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. एकाच परिवारातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना वाटप केलेले भूखंड रद्द करण्यात यावे. सदर अभिन्यासामधील अनेक नागरिकांकडून पैसे घेऊन भूखंड वाटप करण्याचे आमिष दाखविणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संपत्तीची पोलीस विभागाद्वारे विभागीय पोलीस चौकशी करून संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, अन्यायग्रस्त नागरिकांचे पैसे तात्काळ परत करण्यात यावे तसेच अतिक्रमणकारी नागरिकांना तात्काळ भूखंड वाटप करण्यात यावी.

Nagpur
Vasai Virar : 40 ई-बससाठी तिसऱ्यांदा Tender काढण्याची पालिकेवर नामुष्की

सोबतच NIT अधिकारी सुरेश चौहान यांची कंत्राटदारासोबत झालेले आर्थिक व्यवहार व अतिक्रमणकारी यांच्याकडून घेतलेले लाचेच्या स्वरुपातील पैशाची विभागीय चौकशी करण्यात यावी. नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची चौकशी व्हावी. NIT कंत्राटदाराचा भूखंड साळीच्या नावे आहे, या व्यवहारात साक्षीदार म्हणून चौहान यांची व इतर एक कंत्राटदार यांची स्वाक्षरी आहे, सदर प्रकरण संशयास्पद असल्यामुळे भूखंडविक्री करणारा फिरोज शेख याचा नावे असलेल्या कामामध्ये NIT अधिकारी चौहान निलंबित झाले होते त्यांच्या या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी मनसे नी केली. मध्य नागपुर विधानसभा क्षेत्राअंतर्गत शासकीय निधी अंतर्गत वाटप केलेल्या निविदेच्या अनुषंगाने फिरोज शेख यांना दिलेले काम न करता मनपा नागपुर या विभागा‌द्वारे केलेल्या सिमेंट रस्त्याचे काम दाखवुन विभागाची/शासनाची दिशाभूल करणाऱ्या कंत्राटदारावर आजीवन काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी. परंतु कंत्राटदारावर आपण कोणतीही कार्यवाही केलेली नाही याचाच अर्थ वरिष्ठांचे लागेबांधे व आर्थिक व्यवहार कंत्राटदार यांच्या सोबत आहे हे सिद्ध होते. असे आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी लावले. सोबतच काळ्या यादीतील कंत्राटदारांना विकास कामाचे अवैध वाटप व निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली गेली.

Nagpur
Nagpur : 'मेडिकल'च्या विकासासाठी 514 कोटींचा निधी; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार अमृत महोत्सवाचे उद्घाटन

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करू : NIT चेअरमन

NIT चेयरमेन मनोज सूर्यवंशी यांना या प्रकारणा बद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, एनआईटी चे पूर्व अधिकारी बद्दल मनसे च्या तक्रारी होत्या. त्यांना आपन सस्पेंड केल आहे. त्याची रितसर चौकशी सुरु आहे. त्यांना चार्जशीट देऊन त्याचे म्हणणे ऐकू आणि विभागीय चौकशी त्रयस्त अधिकाऱ्यांकडून सुरु केली आहे. सूर्यवंशी म्हणाले की, एनआयटी ने लोकांच्या सोईसाठी सगळच ऑनलाइन सुरु केल आहे. त्यांनी ज्या तक्रारी केल्या त्यासाठी आम्ही जीएम ला नियुक्त केल आहे. चौकशी तुन जे ही बाहेर येईल त्याच्यावर योग्य करवाई केली जाईल. भाग नकाशे ऑनलाइन केले, गुंटेवारी सुद्धा ऑनलाइन झाली, आर एल पन घर बसल्या एनआयटी पाठवत आहे. 40 हजार लोकांचे काम आम्ही घर बसल्या केले. टेंडर बाबत सुद्धा आम्ही चौकशी करण्याचे आदेश जनरल मॅनेजरला दिले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com