राज्यात आता यापुढे औषध खरेदीसाठी लागणार नाही वेळ; मंत्री सावंत यांची ग्वाही

Tanaji Sawant
Tanaji SawantTendernama

नागपूर (Nagpur) : वेगवेगळे सरकारी विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्रकारची औषधे, उपकरणे वेगवेगळ्या दरात खरेदी करत होते. 'महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणा'मुळे यापुढे एकात्मिक पद्धतीने खरेदी करता येणार असल्यामुळे अविलंब खरेदी प्रक्रिया पार पडणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

Tanaji Sawant
Ajit Pawar : मोदींचे ते स्वप्न आम्ही पूर्ण करणारच! असे का म्हणाले अजित पवार?

राज्य सरकारच्या विविध विभागांसह महापालिका, जिल्हा परिषदेतील औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात 'महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहे.  आरोग्य सहसंचालक दर्जाचा व्यवस्थापक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे आहेत. राज्य सरकारचे विविध विभाग आपल्या गरजेनुसार औषधे, वैद्यकीय उपकरणे, साहित्यसामग्री आदींची खरेदी करतील, असेही मंत्री सावंत यांनी सांगितले.

Tanaji Sawant
Nagpur : विधानसभेत सरकारची घोषणा; आश्रमशाळेतील शिक्षकांची 282 पदे लवकरच भरणार

दरम्यान, नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीने रुग्ण सेवेकरिता यंत्रसामग्री, औषधे व सर्जिकल साहित्य या वैद्यकीय सुविधासाठी १३ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली. यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की, मेयो आणि मेडिकल रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी सध्या औषधे व यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच यासंदर्भात आणखी काही समस्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com