'MPSC'मार्फत एप्रिल 2024 पर्यंत सरकारी रुग्णालयात होणार पदभरती

MPSC
MPSCTendernama

नागपूर (Nagpur) : राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातील वर्ग 1, वर्ग 2 रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एप्रिल 2024 पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत सांगितले. तसेच वर्ग 3 संवर्गाच्या 5600 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत सुरू आहे. डिसेंबरअखेर आदेश निघणार आहे. तसेच वर्ग 4 पदांची भरती बाह्य तत्वाद्वारे लवकर करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPSC
'आदित्य' राजाच्या कृपेने 'वरुण' राजाच्या टेंडरचा पाऊस; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

मोठ्या शहरांमध्ये असलेल्या खासगी रुग्णालयात प्रशासकीय व वैद्यकीय विभाग कार्यरत असतात. त्यामुळे डॉक्टरांना प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याची गरज नसते. याच धर्तीवर राज्यातील सरकारी रुग्णालयात असे दोन विभाग करण्याचा सरकार विचार करीत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सुभाष धोटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य नाना पटोले, डॉ. राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, प्रतिभा धानोरकर, अमित देशमुख, प्रणिती शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.

MPSC
Eknath Shinde : धारावी पुनर्विकास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; रहिवाशांचे जीवनमान उंचावणार

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोविड काळात चंद्रपूर रुग्णालयात जेम पोर्टल माध्यमातून वैद्यकीय साहित्य व अनुषंगिक वस्तूंची खरेदी केली आहे. कोविड काळात इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्लॅनमधून खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून चंद्रपूर रुग्णालयात खरेदी देखील करण्यात आली आहे. याबाबत काही अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com