नागपूरला 'स्पोर्ट्स हब' उभारणार; मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा

Sports Complex
Sports ComplexTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नागपूर, मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात वसतीगृह, अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे 'नागपूर स्पोर्ट्स हब' उभारण्यात येत आहे. हे स्पोर्ट्स हब पूर्णत्वाला नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर 'नागपूर स्पोर्ट्स हब'ची उभारणी विहित वेळेत करावी, कामाचा दर्जा, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही भरणे यांनी दिले.

Sports Complex
तब्बल तीनशे एकरवर वसणार तिसरी मुंबई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

मंत्रालयात 'नागपूर स्पोर्ट्स हब' उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री भरणे बोलत होते. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, उपअभियंता प्रशांत शंकरपुरे, वास्तूविशारद नुपूर वैद्य, नम्रता शेट्टी उपस्थित होते.

Sports Complex
Mumbai : बदलापूर ते कर्जत रेल्वे मार्गावर 10 उड्डाणपूल उभारणार

मंत्री भरणे म्हणाले की, नागपूर, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटर, क्रीडा विद्यापीठाशी संलग्नीत कोर्सेससाठी अकॅडमी सुरु करुन त्यात स्पोर्ट्स मीट, स्पोर्ट्स फिजीयोथेरेपी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स इव्हेंट, स्पोर्ट्स कोचींग इत्यादी कोर्सेस सुरु करुन खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करीयरची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी विशेष इनोव्हेटिव्ह स्पोर्ट्स स्कूलची उभारणी करण्यात येत आहे. स्पोर्ट्स इन्फॉरमेशन सेंटर उभारुन नवोदित खेळाडूंना व पालकांना विविध खेळाची अद्ययावत माहिती, शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजना, विविध पुरस्कार, शासकीय व खाजगी क्षेत्रातील सेवेच्या संधी इत्यादीबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com