Yavatmal : ZP शाळेत शालेय पोषण आहार पुरविणारी 'ही' कंपनी का पडली वादाच्या भोवऱ्यात?

Mid Day Meal
Mid Day MealTendernama

यवतमाळ (Yavatmal) : यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे वितरित होणारा शालेय पोषण आहार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. त्यामुळे नागपूरची जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड ही ठेकेदार कंपनी केंद्रस्थानी आली आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असणाऱ्या चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चॉकलेटचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या मिलेट्स चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावातूनही चॉकलेट खाल्ल्यानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Mid Day Meal
Mumbai Traffic News : मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय; 'या' 3 पुलांची...

शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वाटपाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एकूण 95 पालकांपैकी 65 पालकांनी शालेय पोषण आहार घेतला. त्यांनी चॉकलेट घरी नेले त्यापैकी 25 पालकांनी चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व पालकांना धक्का बसला. पालकांनी मुख्याध्यापकांना हे चॉकलेट परत आणून दिले. 'जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने 30 ग्रॅम प्रति याप्रमाणे तीन प्रकारचे चॉकलेट विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या मध्यामध्ये शाळेत ठेकेदारांनी पोहोचवले. यावेळी शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. विशेष म्हणजे हा शालेय पोषण आहार जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार कसा पाठवण्यात आला ? याबद्दल प्रश्न निर्माण होतो आहे.

Mid Day Meal
Nagpur News : ...तर कुटुंबासह आत्महत्या करणार! का वैतागला कंत्राटदार?

शाळेचे मुख्याध्यापक सापडतील अडचणीत : 

कंपनीने पाठवलेल्या या तीनही चॉकलेटला कुठल्याही प्रकारची चव नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चॉकलेट व्यवस्थित राहावे त्यासाठी कुठलीही शितपेटीची व्यवस्था नाही. चॉकलेटची गुणवत्ता अतिशय खालच्या दर्जाची आहे. त्याच्यावर किंमत देखील नाही. तालुक्यातील बऱ्याच गावातून चॉकलेट खाल्ल्यानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु चॉकलेट लवकरात लवकर वाटून संपवा असा आदेश वरिष्ठांकडून आल्यामुळे मुख्याध्यापक मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com