Wardha : 151 कोटी खर्चून 400 बेडचे बनणार 'हायटेक' हॉस्पिटल

Hospital
HospitalTendernama

वर्धा (Wardha) : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून हिंगणघाट शहरात 400 बेडचे रुग्णालय बनविण्याची घोषणा करण्यात आली होती. हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांनी या रुग्णालयचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. 

Hospital
Nagpur : महापालिका ऑन वर्कमोड; खड्डे बुजविण्यास सुरवात

400 बेडचे रुग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास व आराखड्याला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आणि यासाठी राज्य सरकार तर्फे 151 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी ऐतिहासिक व सुवर्णक्षण राज्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्यानंतर आमदार कुणावार यांनी ते महाविद्यालय हिंगणघाट मध्ये कसे आणता येईल यासाठी पाठपुरावा केला होता सदर काॅलेजची मान्यता घेण्यासाठी 400 खाटांचे रुग्णालय आवश्यक असण्याची बाब त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या लक्षात आणून दिली.  

Hospital
Nagpur News : नागपुरातील नद्यांच्या 90 टक्के स्वच्छतेचा आयुक्तांचा दावा खरा आहे का?

शासन आदेशानुसार प्रशासकीय स्तरावर 400 बेडचे रुग्णालय अंदाजपत्रक व इमारत आराखड्याचे काम सुरू झाले होते आचारसंहितेमुळे सदर अंदाजपत्रक मान्यतेची घोषणा लांबणीवर पडली होती मात्र आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने 400 बेडच्या रुग्णालयाकरीता 151 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. छोट्या-मोठ्या उपचारासाठी लोकांना नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये लोकांना जावे लागत होते. हृदयाच्या आजारावरील उपचारासाठी 2 डी ईको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसाठीही बाहेर जावे लागत होते. न्यूमोनियावर उपचार आणि निदानासाठी सीटी स्कॅन, किडनीसाठी डायलिसिस असे अनेक उपचार या रुग्णालयात केले जातिल. सोबतच हाडाचे आजार, सांधे प्रत्यारोपण, कॅन्सरसारख्या आजारावर निदान, उपचार या रुग्णालयात केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com