Nagpur : आता जूनमध्येच मिळणार ठेकेदारांना पैसे?, कारण...

Money
MoneyTendernama

नागपूर (Nagpur) : हिवाळी अधिवेशनात दुरुस्ती, डागडुजी, रंगरंगोटी, बांधकामाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना या कामाचे पूर्ण पैसे आजपर्यंत मिळालेले नाहीत. सरकार तुकड्यात निधी देत ​​असल्याने ठेकेदारांना पूर्ण मोबदला मिळणे कठीण झाले आहे. सरकारने नुकताच काही निधी दिला, पण तो पुरेसा नाही. आता उर्वरित निधी जूनमध्येच ठेकेदारांना मिळू शकणार आहे.

Money
Mumbai : वर्षभरात हायटेक ससून डॉक; मंत्री मुनगंटीवार यांची माहिती

हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) ठेकेदारांच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे केली जातात. पीडब्ल्यूडीच्या प्रभाग-1 मध्ये सर्वाधिक कामे केली जातात. ठेकेदारांनी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्येच काम पूर्ण केले, परंतु कामाची पूर्ण रक्कम अद्याप मिळालेली नाही.

Money
Nagpur: 40 कोटी खर्चून पालिकेने विकत घेतले शहाणपण! 5 एकरात...

हिवाळी अधिवेशनात काम करणाऱ्या ठेकेदादारांना प्रतीक्षा करावी लागेल सरकारने आतापर्यंत केवळ 70 टक्के निधी दिला आहे. 31 मार्च पर्यंत ठेकेदारांना उर्वरित निधी मिळण्यासाची खात्री होती परंतु निधी काही मिळाला नाही. आणि एप्रिल व मे महिन्यात सरकार निधी वाटप नाही करत त्यामुळे आता जून पर्यंत ठेकेदरांना थांबावे लागेल. संबंधित बिले मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आली. शासनाने तुकड्यात निधी दिल्याने ठेकेदारांना बिलाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मार्च 2023 मध्ये सरकारने निधी जारी केला. मंडळाच्या माध्यमातून हा निधी प्रभागात पोहोचला, मात्र अपुऱ्या निधीमुळे पूर्ण भरणा होत नाही. 

Money
Nashik : सिन्नर-शिर्डी 45 किमी प्रवासासाठी भरावा लागणार एवढा टोल

व्याज वाढल्याने ठेकेदार तणावात

हिवाळी अधिवेशनात 100 कोटींहून अधिक कामे केली जातात. ठेकेदार बँकेकडून कर्ज घेऊन काम करतात. गेल्या काही महिन्यांवर नजर टाकली तर बँकेचे व्याज खूप वाढले आहे. सततच्या व्याजदरवाढीमुळे ठेकेदारांचे कंबरडे मोडत आहे. ठेकेदारांनी नोव्हेंबरमध्ये काम सुरू केले. चार महिने उलटले. आतापर्यंत केवळ 70 टक्के निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधीसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा केल्यास ठेकेदारांची अवस्था दयनीय होऊ शकते. येथून कोणतीही अडचण नसल्याचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी स्पष्टपणे सांगतात. सरकारकडून निधी उपलब्ध होताच वितरीत करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com