फडणविसांच्या 'देवगिरी'चे इंटेरिअर झाले 'ग्रीन'

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नागपूर येथील देवगिरी बंगला ग्रीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुशोभित करण्यात आला आहे. त्यामुळे बंगल्यावर होणाऱ्या विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.

Devendra Fadnavis
पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

सेंट विंसेंट पलोटी अभियांत्रिकी येथून सिव्हिल इंजीनिअरिंग अभ्यासक्रम पू्र्ण करणाऱ्या यश दुधनकर या युवकाने विसाव्या वर्षीच इनसाईट होम डेकोर कंपनीची स्थापना केली आहे. अवघ्या तीन वर्षांत त्याने आतापर्यंत सात बांधकाम साईट्स पूर्ण केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला बोलावून देवगिरी बंगल्याचे काम दिले. हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रामगिरीवर बंगल्यावर झालेल्या सुशोभिकरणातही त्याने मदत केली.

Devendra Fadnavis
राज्यातील 'या' 10 जिल्ह्यातील रस्त्यांसाठी आशियाई बँकेशी करार

अलीकडे ऊर्जा बचतीसाठी ग्रीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. घराच्या सुशोभीकरणासोबतच ऊर्जा बचतीकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारनियमनाचे चटके अनेक वर्षे सोसले आहे. त्यात व्हीआयपींच्या बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असतो. एससी, लाईट, पंखे दिवसभर सुरू असतात. कर्मचारी आणि नागरिकांचा येथे राबता असतो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चोवीस तास सुरक्षा कर्मचारी असतात. त्यामुळे दिवे बंद ठेवता येत नाहीत. त्यामुळे भरमासाठ विजेचे बिल भरावे लागते.

Devendra Fadnavis
1026 कोटींचा सिन्नर-शिर्डी चौपदरी मार्ग अंतिम टप्प्यात

देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जाबचतीचे तंत्रज्ञान यश दुधनकर या युवकाकडून आधी समजून घेतले. सुशोभिकरणावर होणारा खर्च आणि विद्युत बिलाच्या खर्चाची पडताळणी केल्यानंतर देवगिरीचे काम त्याच्याकडे सोपविले. देवगिरीवर येणाऱ्या विजेच्या खर्चाचे अद्याप मूल्यमापन व्हायचे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com