अखेर हेमाडपंथी वास्तूशैलीने निर्मित 'या' मंदिराचा होतोय कायापालट

Temple
TempleTendernama

भंडारा (Bhandara) : देखभालीसाठी गिरी समाजातील लोकांना सोबत घेऊन 2007 मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आले होते. तेव्हापासून पाठपुरावा करण्यात आला. अखेर सरकारतर्फे दखल घेण्यात येऊन या स्थळास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला.

Temple
Mumbai : 'त्या' पुनर्विकास प्रकल्पातील नऊ हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे पार्किंग

2013 मध्ये संरक्षित भिंत, फ्लोरिंगकरिता 73 लाख रुपये मंजूर होऊन काम करण्यात आले. परंतु, पुढे जतन, संरक्षणचे काम निधीअभावी रखडले होते. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे 800 वर्षे जुने हे हेमाडपंथी वास्तू शैलीने निर्मित मंदिर असून, कोरीव व नक्षीकाम केलेला अद्भुत शिल्पकलेचा हा खजिना आहे. राजस्थान येथील जसे स्मारके बांधली आहेत तसेच या ठिकाणीसुद्धा गोसावी समाजातील संतांची स्मारके, छत्र्या आणि चार मंदिराचा समूह आहे.

Temple
Nagpur : महापालिकेचा 5523 कोटींचा अर्थसंकल्प; बघा काय म्हणाले मनपा आयुक्त

कायापालटानंतर एक आगळे वेगळे तीर्थस्थळ म्हणून नावारूपास येईल, पुरातन वारसांना जपता यावे, त्यांना सन्मान व ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी याकरिता संघर्ष करण्यात आला.अनेक वर्षापासून येथील स्थानिक लोकांचा सुद्धा वास्तु निर्मिति संघर्ष सुरु होता. पण आता या मंदिराच्या विकास कार्यसाठी कोटयवधि रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच मंदिराच्या कामासाठी टेंडर काढले जातील आणि निर्माण कार्य सुरु केले जातील

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com