Amravati : 'लक्ष्य 2055'ची जलपूर्ती; पाणीपुरवठा योजनेसाठी 985 कोटींची मंजुरी

water
waterTendernama

अमरावती (Amravati) : अमरावती शहराला वर्ष 2055 पर्यंत नियमित व मुबलक जलपूर्ती करणाऱ्या केंद्र पुरस्कृत अमृत- 2 अमरावती वाढीव पाणीपुरवठा 985.49 कोटींच्या योजनेला केंद्र सरकारच्या शिखर समितीने मंगळवारी मंजुरी प्रदान केली आहे. ही योजना पूर्णत्वास जावी, यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी सातत्याने राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे, हे विशेष. या योजनेला मंजुरी प्रदान केल्याबाबत त्यांनी केंद्र सरकारसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

water
Mumbai : कोस्टल रोड 100 टक्के मजबूत; अशी झाली यशस्वी परीक्षा

अमरावतीला पाणीपुरवठा करणारी अपर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळाईपर्यंतची डब्लूटीपी पाइपलाइन जुनी लोखंडी असून शिकस्त झाली आहे. या गुरुत्व वाहिनीचे 30 वर्षांचे आयुष्यमान सन 2024 मध्ये संपुष्टात येत आहे. वारंवार गळती लागत असल्याने दुरुस्तीच्या कामांना चार ते पाच दिवस लागत असल्याने नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत गैरसोय होते. नागरिकांना पाण्याच्या शोधात वणवण करावी लागत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण होते. त्यामुळे सन 2055 पर्यंत नियमित व मुबलक जलपूर्तीची दूरदृष्टी बाळगून अमरावती वाढीव पाणीपुरवठा योजना अमृत 2.0 अभियानाअंतर्गत सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकी ते पुढे तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मृदू पोलादी जलवाहिनी अंथरण्याचा प्रस्ताव 985.49 कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी ठेवला. दरम्यान, अमरावतीकरांना पिण्याच्या मुबलक पाण्यासह अन्य सुविधांबाबत आग्रही असल्याचे आ. खोडके यांनी स्पष्ट केले.

water
Mumbai-Pune आणखी जवळ येणार; 'त्या' मार्गासाठी 3 हजार कोटींचे टेंडर

हिवाळी अधिवेशनातही गाजला होता मुद्दा :

अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेला काही तांत्रिक अडचणींमुळे मान्यतेबाबत विलंब लागत होता. परिणामी आमदार सुलभा खोडके यांनी 11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमृत-2 अमरावती वाढीव पाणी पुरवठा 985.49 कोटींच्या योजनेच्या मान्यतेसाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, या मागणीचा पुनरुच्चार करीत सभागृहाचे लक्ष वेधले होते.

केंद्र सरकारच्या शिखर समितीनेसुद्धा केंद्र पुरस्कृत

अमृत-2 अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना 985.49 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी प्रदान केली. आता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. सन 2055 पर्यंत नियमित व मुबलक जलपूर्तीने अमरावतीला नवी जलसंजीवनी मिळाली आहे. अशी माहिती आमदार सुलभा खोडके यांनी दिली.

अजित पवार यांच्या दालनात बैठक :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 जुलै 2023 रोजी राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती बैठकीत मुख्य सचिवांना अमृत-2 अमरावती वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास मंजुरीबाचत निर्देश दिले. यात एकूण 985.49 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत केंद्र शासन 328.48 कोटी इतका भार उचलेल व उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून खर्च करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणला जाईल, असा निर्णय घेत राज्य उच्चाधिकार समितीच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com