Gadchiroli : 13 वाळू डेपोंसाठी टेंडर; निवडणूक आचारसंहितेमुळे...

Sand (File)
Sand (File)Tendernama

गडचिरोली (Gadchiroli) : निवडणूक आचारसंहितेमुळे थांबलेल्या 7 रेती घाट लिलावांच्या मंजुरीचे प्रस्ताव निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने अंतिम करण्यात येत असल्याची माहिती गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिली आहे.

Sand (File)
Mumbai : पावसाळी खड्ड्यांसाठी बीएमसीचे 250 कोटींचे बजेट; खड्डे शोधण्यासाठी अभियंत्यांचा दुचाकीवरून फेरफटका

गडचिरोली जिल्ह्यात एकूण 49 रेतीघाट असून त्यापैकी 36 रेतीघाटांवरील 13 वाळू डेपो मंजूर करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पहिल्या व दुसऱ्या फेरी दरम्यान एकूण 7 वाळू डेपोकरीता टेंडर प्राप्त झाली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून करारनाम्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले असून देऊळगाव, कुरुड, दूधमाळा, आंबेशिवणी, वाघोली, गणपूर, गडअहेरी-बामणी, या 7 रेती डेपोकरीता करार अंतिम करण्यात येत आहेत. रेतीघाटांना पर्यावरण विषयक अनूमतीसाठी 19 जून रोजी जनसुनावणी रेती घाट लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही प्रत्यक्ष रेतीच्या उत्खननासाठी पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते. 

Sand (File)
Sambhajinagar : मातोश्री पानंद योजनेतील लाचखोर चौकशी अधिकारीच अडकला चौकशीच्या जाळ्यात 

जिल्ह्यातील 49 रेती घाटांपैकी वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध असलेल्या 33 रेतीघाटांना पुढील 3 वर्षासाठी पर्यावरण अनुमती प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आता 19 जून रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील 3 वर्षाकरीता (2027 पर्यंत) पर्यावरण अनुमती घेण्यासाठी प्रस्ताव मान्यतेकरीता सादर केला जाणार आहे. पुरामुळे रेतीग्रस्त शेतीच्या सर्वेक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केले जाईल. पूरामुळे शेतात साचलेली रेती निष्कासित करुन शेत लागवडी योग्य करण्याकरीता प्राप्त होणाऱ्या परवानगी मागणीच्या प्रकरणात अर्जदाराच्या शेताचे मोजमाप हे प्लेन टेबल पध्दतीने केले जात होते. अशा मोजणीमध्ये मानवीय चुका टाळण्यासाठी वाळू निष्कासनाची परवानगी देण्याआधी अर्जदाराच्या शेताचे आणि संबंधित नदीपात्राचे अचूक रेखांकन/ मोजमाप / सीमा निश्चिती ही काटेकोरपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात एमआरएसएसी म्हणजेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर, यांच्या गुगल-अर्थ या संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने अचूकता निर्धारण आणि प्रत्यक्ष तहसीलदार यांच्या उपस्थितीत रोव्हर यंत्राने शेतीचे मोजमाप करणे या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. घरकुल योजनेअंतर्गत बांधकामासाठी जवळच्या नदी नाल्यातून 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांकडून सुरू असून यासाठी 80 हजार झिरो रॉयल्टी पासेस तालुक्यांना वाटप केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com