13 कामे, सात वेळा टेंडर, दोन वर्षांचा काळ; कधी होतील रस्ते?

Gadchiroli

Gadchiroli

Tendernama

गडचिरोली (Gadchiroli) : अनेकदा कंत्राटदारांना (Contractor) खूष करण्यासाठी कामांचे छोटे, छोटे तुकडे करून खिरापतीसारखे वाटण्यात येतात. पण, येथील नगर परिषदेची डांबर रस्ता निर्मितीची छोटी कामे घेण्यास कंत्राटदार उत्सुकच नसल्याने तब्बल सात वेळ टेंडर (Tender) काढण्यात आले. त्यासाठी कामांचे एकत्रीकरण करून ही टेंडर काढण्यात आले. पण, या सर्व प्रक्रियेत तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला असून, अद्याप या रस्त्यांची कामे पूर्णच झालेली नाहीत.

Gadchiroli

Nagpur ZP : पदाधिकाऱ्यांचे एक कोटींच्या पुस्तके खरेदीसाठी लॉबिंग

गडचिरोली नगर परिषदेअंतर्गत नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५ लाख ६२ हजार १६० रुपयांची व नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ७३ लाख ५७ हजार ३८२ रुपयांची डांबरी रस्ता (बीटी रोड) निर्मितीसाठी एकूण ८९ लाख १९ हजार ५४२ रुपयांचे टेंडर काढण्यात आले. यात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत ५ रस्त्यांची कामे होती, तर नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ९ रस्त्यांची कामे होती. या एकूण १३ कामांसाठी वेगवेगळे टेंडर काढण्यात आले होते. पण, टेंडर भरण्यासाठी कंत्राटदार पुढे येत नसल्याने टेंडरची तारीख पुढे वाढविण्यात येत होती. पण, एक, दोन नव्हे, तर तब्बल सात वेळ टेंडर काढण्यात येऊनही कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अखेर ही १३ एकत्र करून त्याचे फक्त दोनच तुकडे करण्यात आले.

Gadchiroli

मुळा-मुठा नदीकाठचा होणार कायापालट; 650 कोटींचे निघाले टेंडर

नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५ लाख ६२ हजार १६० रुपयांची टेंडर काढण्यात आली. तसेच नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ७३ लाख ५७ हजार ३८२ रुपयांचे टेंडर काढण्यात आली. या दोन्ही टेंडरसाठी पी. डब्ल्यू. तामसेटवार यांचे टेंडर दर ९. ९९ टक्क्यांनी जास्त असल्याने या सर्व कामांचे कंत्राट त्यांना देण्यात आले. पण, या सर्व प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने मागील दोन वर्षांपासून ही रस्त्यांची कामे रखडली आहेत. नागरी दलित वस्ती सुधार योजनेची ९ रस्त्यांची कामे होती. त्यातील ८ रस्त्यांची कामे सुरू झाली असून दोन वर्षांचा कालावधी लोटूनही एका रस्त्याचे काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे रस्त्यांअभावी शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Gadchiroli

'समृद्धी'च्या कंत्राटदाराला कोर्टाचा दणका; ७५० कोटींचे होते टेंडर

वर्षभर सभाच नाही
या कामांसाठीची टेंडर प्रक्रिया २०१९ पासून सुरू करण्यात आली होती. पण, याच काळात कोरोनाचे थैमान सुरू झाल्याने नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यातच येत नव्हती. तब्बल एक वर्ष ही सभाच न झाल्याने कामाचे आदेश निघालेच नाहीत. पुढे मार्च २०२१ मध्ये सर्वसाधारण सभा होऊन कामाचे आदेश देण्यात आले. पण, या सर्व घडामोडीत पुन्हा वेळ गेला आणि पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात डांबर लवकर गरम करून पातळ करणे कठीण होऊन बसते. त्यामुळे हे काम पुन्हा रखडले, अशी माहिती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अंकुश भालेराव यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com