Good News : नागपूरकरांनो G-20 परिषदेत असे व्हा सहभागी

G-20
G-20tendernama

नागपूर (Nagpur) : कोट्यवधी रुपये खर्च करून नागपूर शहराला G - 20 आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी नववधू सारखे सजवले जात आहे. अंदाजे 122 कोटी रुपये वेगवेगळ्या बांधकामावर आणि सजावटी वर खर्च केले जात आहे. येणाऱ्या 20, 21 आणि 22 मार्च 2023 ला नागपूरच्या होटेल रेडिसन ब्लू येथे G - 20 आंतरराष्ट्रीय बैठक होणार असून, त्याचा फायदा आता नागपुरकरांना आणि विदर्भाच्या लोकांना सुद्धा मिळणार आहे, अशी माहिती सिविल इंडिया सचिवालयाचे संरक्षक (पैट्रोन) डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी शुक्रवारी दिली.

G-20
Thane : महामार्ग, रस्ते, पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार: शिंदे

सिव्हील 20 इंडियाने 14 विषय निवडले आहेत. ज्यावर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे नागपुरात छोट्या-मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे विदर्भाच्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे C- 20 ने नागपूर वॉइस म्हणून कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यात नागपूर आणि विदर्भाच्या लोकांना पाणी आणि नदी या विषयावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा काय दृष्टीकोण आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडता येणार आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

सिव्हिल 20 इंडिया सचिवालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत संबोधित करताना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष सहस्रबुद्धे म्हणाले की, भारत यावर्षी जी-20 चे अध्यक्षपद भूषवत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. भारताला G20 चे अध्यक्षपद मिळाल्यामुळे देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्याचा समारोप दिल्लीतील शिखर परिषदेने होईल.

G-20
Vidarbha : सहा जिल्ह्यांमध्ये होणार नवीन वैद्यकीय महाविद्यालये

14 मुख्य विषयांवर होणार चर्चा

G - 20 आंतरराष्ट्रीय बैठकीचा उद्घटन 20 मार्च ला होणार असून त्यात पर्यावरण रक्षण जीवन शैलीतून कसा विकास करता येईल, पारंपारिक कारीगिरी आणि कला कौशल्याचा विकासाचा व रोजगाराचा संबंध जोड़ने, जनतांत्रिक दृष्टीने काम करण्याची गरज अश्या अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, G-20 मध्ये सुमारे 11 प्रतिबद्धता गट आहेत, त्यापैकी सिव्हिल 20 हा एक गट आहे. नागरी समाज, स्वयंसेवी संस्था, विकास क्षेत्राचा दृष्टिकोन G-20 देशांच्या प्रमुखांपर्यंत नेणे हा त्याचा उद्देश आहे. सिविल 20 इंडियाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माता अमृतानंदमयी यांच्याकडे असून G-20 सचिवालयाची जबाबदारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सांभाळत आहे. यात एक सुकाणू समिती आणि आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती आहे. त्यात देश-विदेशातील लोकांचा सहभाग असतो.

G-20
Sambhajinagar: 78 कोटीचा चुकीचा आराखडा;रेल्वेच्या भुयारी मार्गात..

नागपूरची बैठक महत्त्वपूर्ण

सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, सिव्हिल 20 देशभरात अनेक बैठका आयोजित करत आहे, त्यापैकी नागपूरची बैठक सर्वात महत्वाची आहे. या बैठकीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कामांवर चर्चा होणार आहे. सिव्हिल 20 इंडियाने 14 विषय निवडले आहेत. या विषयांवर वेगवेगळ्या सत्रात चर्चा होणार आहे. जयपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या बैठकीत एक पॉलिसी पॅक जारी केला जाईल जो G 20 ला सुपूर्द केला जाईल. सिव्हिल 20 भारतात एकूण 14 कार्य गट तयार करण्यात आले आहेत.

शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यावरण, कारागीर, सेवा, लोकशाही, मानवाधिकार, शाश्वत विकास या विषयांचा या कार्यगटांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या विषयांवर चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील नामवंत अभ्यासक, एनजीओ कार्यकर्ते, धोरणकर्ते येणार आहेत. या आंतरराष्ट्रीय बैठकीत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, भारताचे संयुक्त राष्ट्र प्रमुख शाम्बी शार्प, G 20 शेर्पा अमिताभ कांत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com