Fadnavis: नागपूरकरांनी पुन्हा का मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : विद्यापीठ अनुदान आयोगाचा (UGC) स्वायत्त दर्जा प्राप्त करणाऱ्या नागपूरच्या लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला आता स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळणार आहे. या संदर्भातील विधेयकाला राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एलआयटी यापुढे लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ (लिटू) या नावाने ओळखले जाणार आहे.

Devendra Fadnavis
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा सरकारला जाब

एलआयटीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून विभक्त करून विद्यापीठात रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पत्राद्वारे संदर्भ मागविला होता. यामध्ये विद्यापीठाच्या इमारती, जागा, कर्मचारी तसेच कॉर्पस फंड याबाबत माहिती विचारण्यात आली होती. विद्यापीठाने या मुद्द्यांची माहिती शासनाकडे सादर केली.

यासाठी आवश्यक असलेल्या विधेयकाचे प्रारूप शासनास सादर करण्यात आले होते. विधेयकाचे अधिनियमात रुपांतर होण्यापुर्वी संस्थेत व विद्यापीठात ज्या बाबींचे हस्तांतरण होणार आहे, त्या स्पष्ट होणे आवश्यक असल्याने सामंजस्य करार करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे तर एलआयटीच्या वतीने संचालक डॉ. राजू मानकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

Devendra Fadnavis
Nashik: का रखडले सुरत-चेन्नई महामार्गाचे भूसंपादन?

विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर एलआयटीला स्वतंत्र जागा आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार आहे. लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेचे विद्यापीठात रुपांतर झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नामांकन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच टप्प्यात संस्थेकडे हस्तांतरित करावे लागणार आहे.

Devendra Fadnavis
PM Modi करणार नागपूर विभागातील 'या' 15 रेल्वे स्टेशन्सचा कायापालट!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेच्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी मिळवून दिली ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. नागपूरच्या शैक्षणिक विकासात या विद्यापीठाच्या योगदानामुळे अधिक भर पडणार असल्याने नागपूरकरांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com