PM Modi करणार नागपूर विभागातील 'या' 15 रेल्वे स्टेशन्सचा कायापालट!

PM Narendra Modi
PM Narendra ModiTendernama

नागपूर (Nagpur) : रेल्वे अर्थसंकल्पात (Railway Budget) देशातील छोट्या रेल्वे स्टेशनला मॉडेल रेल्वे स्टेशन बनवण्याची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत मध्य रेल्वेच्या 15 छोट्या स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय स्तरावर 6 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर या स्थानकांच्या विकासाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

PM Narendra Modi
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा सरकारला जाब

या स्थानकांचा होणार विकास... 

बल्लारशहा, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, आमला, नरखेड, काटोल, पांढुर्णा, जुन्नरदेव, हिंगणघाट, मुलताई, गडचिरोली, गोधनी या स्टेशनचे नवीनिकरण केले जाणार आहे.

सुविधा होतील अधिक चांगल्या...

रेल्वेमध्ये सध्या 3 श्रेणीचे रेल्वे स्टेशन समाविष्ट आहेत, ज्यात A, B आणि C श्रेणी आहेत. अ श्रेणीच्या स्टेशन वर गाड्यांची संख्या आणि प्रवाशांची गर्दी जास्त असते. या अनुसारच अ वर्गाची स्टेशन विकसित केली जातात. प्रवाशांच्या सुविधा येथे अधिक आहेत.

निवडक गाड्यांना बी आणि सी श्रेणीच्या स्टेशनवर थांबतात. त्यामुळे प्रवाशांची वर्दळही कमी असते. या स्टेशनवर सुविधाही कमी असते. अशा B आणि C स्टेशन ला अमृत स्टेशन बनविले जाणार आहे. त्यामुळे येथील सुविधा सुद्धा वाढणार आहेत.

यामध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एकूण 15 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान देशभरातील रेल्वे स्थानकांसाठी ऑनलाइन कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.

PM Narendra Modi
Nashik: का रखडले सुरत-चेन्नई महामार्गाचे भूसंपादन?

‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत सर्व स्टेशनवर प्रवासी केंद्रीत महत्त्वाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने स्टेशनमध्ये प्रवेश, मोफत वाय-फाय, वेटिंग रूम आणि टॉयलेटसाठी चांगल्या सुविधांवर भर दिला जाईल. यासोबतच स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिक चांगली माहिती देणारी यंत्रणाही या मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

PM Narendra Modi
तुकडेबंदी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता...

याशिवाय स्थानकाजवळील रस्त्यांचे अवांछित बांधकाम हटवून रुंदीकरण करण्यात येणार आहे. प्रमाणित चिन्हे, पदपथ आणि सुनियोजित पार्किंग क्षेत्राची व्यवस्था केली जाईल. या योजनेत महिला आणि दिव्यांगांचीही काळजी घेण्यात आली आहे. सर्व श्रेणीतील स्टेशनवर महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे बनवली जातील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com