Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयाबद्दल काय म्हणाले फडणवीस?

BEST Mumbai : नवीन बस गाड्या खरेदीसाठी बेस्ट परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. परिणामी मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे.
Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : मुंबईतील ‘बेस्ट’च्या (BEST) अनेक बस जुन्या झाल्या असल्या तरी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात १,३०० बस विकत घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याची ऑर्डर काढली असून लवकरच ‘बेस्ट’च्या ताफ्यात या बस दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत दिली.

Nagpur
अबब! 300 कोटी रुपयांचे बजेट तब्बल 2,963 कोटींवर गेले?

कलम २८९ अन्वये शिवसेना (ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. सुनील शिंदे यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील बेस्ट बस अपघात प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला.

मुंबईत एकाच आठवड्यातच कुर्ला आणि गोवंडीत बेस्ट बसचा अपघात झाला. कुर्ला येथील घटनेत ८ जण दगावले तर ४२ जण जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मागील वर्षभरात बेस्टचे ३४७ अपघात झाले. अनेक निष्पापांचे यात बळी गेले. आर्युमान संपलेल्या गाड्या रस्त्यावर आल्याने अपघात वाढत आहेत.

नवीन बस गाड्या खरेदीसाठी बेस्ट परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. परिणामी मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. शासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच आयुर्मान संपलेल्या बस गाड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन मांडत, सभागृहात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. बेस्ट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्त, बेस्टचे प्रमुख यांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या.

उपाययोजनांचे निर्देश : फडणवीस
बेस्टचा अपघात घडला त्यासंदर्भात चालकाची अल्कोहोलची चाचणी केली. परंतु, त्यामध्ये तसे काहीही आढळलेले नाही, तरीही त्याबाबत चालकांची अचानक तपासणी सुरु केली आहे. तथापि, या अपघातांमधील सर्व वस्तुस्थिती जाणून घेऊन बेस्ट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्तांना ‘बेस्ट’च्या प्रमुखांसोबत बसून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com