Devendra Fadnavis : कोकणातील 'त्या' मोठ्या प्रकल्पांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : कोकणातील सांबरकुंड प्रकल्पाला आवश्यक वन जमीन हस्तांतरण केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रतीक्षेत असून पाठपुरावा सुरू आहे. केंद्राची अंतिम मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत दिली.

Devendra Fadnavis
Nashik : झेडपीने जलजीवनच्या ठेकेदारांचे 150 कोटी थकवले; 50 टक्के कामे करूनही केवळ 444 कोटींची देयके

रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांवर पाणी योजना राबवण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केले होते, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, बाळगंगा प्रकल्पाच्या धरणाचे काम भौतिकदृष्ट्या ८० टक्के झाले आहे. या प्रकल्पाद्वारे सिडको नवी मुंबई क्षेत्रास पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. सिडकोने प्रकल्पाचा उर्वरीत खर्च सरकारमार्फत करणेविषयी सूचित केले आहे. तरी या प्रकल्पाच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी देण्याची कार्यवाही सरकार स्तरावर प्रगतीपथावर असून, मंजुरीनंतर निधी उपलब्धतेनुसार प्रकल्पाची पुढील कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
          
रायगड जिल्ह्याच्या शाश्वत विकास घडवताना बाळगंगा हेटवणे, सांबरकुंड, काळकुंभे, आंबोली हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी सदस्य अनिकेत तटकरे, आमश्या पाडवी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Devendra Fadnavis
'SRA'तून मिळणाऱ्या घरांच्या विक्रीबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता घरविक्री...

तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा; ३५ कोटींचे बजेट
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याबाबत अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील गावांना लाभ होणार असल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत दिली. या योजनेसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सदस्य समाधान अवताडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री राठोड म्हणाले की, या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी, तंडोर, सिध्दापूर, माचनूर आणि ब्रह्मपुरी तर मोहोळ तालुक्यातील आरबली, मिरी, बेगमपूर, घोडेश्वर, इनकी आणि दक्षिण सोलापूर मधील वडापूर या गावांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या बंधाऱ्यात ५०० दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा होणार आहे. यामुळे परिसरातील ५२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com