Chandrapur : 5 वर्षांपासून निधीअभावी मामा तलावाच्या सौंदर्गीकरणाचे काम थंडबस्त्यात

Chandrapur
ChandrapurTendernama

चंद्रपूर (Chandrapur) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यात रिसोर्ट बेस्ट डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने मूल शहरातील मामा तलावाजवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईच्या वतीने सौंदर्गीकरण करण्याचे काम मागील पाच वर्षांपूर्वी हाती घेतले होते. तीन कोटी खर्च करून अर्धवट काम करण्यात आले. मात्र, निधी संपल्याने वाढीव निधीसाठी पर्यटन विकास महामंडळ मुंबईने 25 मार्च 2021 ला पत्र पाठवून निधीची मागणी करण्यात आली. मात्र, निधीच न मिळाल्याने सौंदर्गीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे.

Chandrapur
Nagpur ZP : अनेक विकासकामे प्रलंबित; आता प्रतीक्षा आचारसंहिता...

जलसंपदा अधिपत्याखाली विभागाच्या असणाऱ्या बसस्थानकाजवळील या मामा तलावाचे सौदर्याकरण सन 2015-16 या वर्षात 498.97 लाख रुपयांचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. सन 2018-19 या वर्षात कामाला सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईच्या देखरेखीखाली सदर काम सुरू आहे. तलावाची खरीप हंगामाची सिंचन क्षमता 192 हेक्टर इतकी आहे. सौंदर्गीकरणानंतरही शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व कोळी बांधवांना मत्स्य व्यवसाय सुव्यवस्थित होणार आहे. तलावाचे सौंदर्गीकरण मूल शहराला नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे. मात्र, वाढीव निधीचा प्रस्ताव 25 मार्च 2021 ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईचे कार्यकारी अभियंत्यांनी मंत्रालयात पाठविला. याला तीन वर्षांचा कालावधी लोटत असताना देखील निधी प्राप्त न झाल्याने काम थंडबस्त्यात आहे. मूल शहरातील मामा तलावाच्या सौंदर्याकरणासाठी मिळालेला निधी संपल्याने काम बंद केले आहे. उर्वरित कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरकडे मागणी करण्यात आली. जिल्हा नियोजन चंद्रपूरच्या मार्फत मंत्रालयात तीन वर्षांपूर्वी निधीची मागणी केली आहे. मात्र, अजूनपर्यंत निधी प्राप्त झाला नसल्याने काम बंद आहे. अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई चे कनिष्ठ अभियंता विजय नागरे यांनी दिली.

Chandrapur
Mumbai : 'मेट्रो-3'चा अटकेपार झेंडा; 'वर्ल्ड टनेल काँग्रेस 2024' मध्ये केस स्टडीज सादर

असे होणार सौंदर्गीकरण :

या तलावात नौका विहाराची सुविधा, उद्यानाची निर्मिती, मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी बोटिंग प्लॅटफॉर्मची निर्मिती, नवीन रस्ते, उद्यानात कारंजे, लहान मुलांसाठी बालोद्यान, प्रसाधनगृह, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदींची सोय केली जाणार आहे. याचबरोबर नवीन रस्त्यावर वृक्षारोपण, विद्युत पथदिव्यांची उभारणी केली जाणार आहे. तलावाच्या सौंदर्याकरणामुळे नागरिकांना विरंगुळा तसेच बसण्यासाठी अप्रतिम स्थळ बनविले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com