Chandrapur : विकासकामांच्या निधीला लागले टक्केवारीचे ग्रहण!

Chandrapur
ChandrapurTendernama

चंद्रपूर (Chandrapur) : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मूल तालुक्यात 29 ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी निधी मंजूर झाला. त्यापैकी 40 टक्के निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला असून, काम पूर्ण झालेल्या सहा ग्रामपंचायतींना त्यांच्या मागणीनुसार 60 टक्के निधी जिल्हा परिषदेने पंचायत समितीला वर्ग केला आहे. मात्र, निधी प्राप्त झाला तरी महिनाभराचा कालावधी लोटला तरी पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतीला निधी न दिल्यामुळे सरपंचामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केवळ टक्केवारीसाठी निधी रोखून धरल्याची चर्चा पंचायत समिती परिसरात सरपंचामध्ये रंगताना दिसत आहे.

Chandrapur
मुंबई तुंबली तरी Mumbai Metro नाही थांबणार; 'MMRDA'चा मोठा निर्णय

जिल्हा वार्षिक योजना 2021-22 या वित्तीय वर्षात मूल तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींना 3 कोटी 46 लाखांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी भवराळा, गडीसूर्ला, जानाळा, डोंगरगाव, सिंतळा, भेजगाव या ग्रामपंचायतीची कामे पूर्ण झाल्याने त्यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेने 20 लाख 95 हजार 156 रुपयांचा 60 टक्के निधी पंचायत समितीला वर्ग केला. पंचायत समितीने ग्रामपंचायतीला तत्काळ निधी वितरित करणे आवश्यक होते. मात्र, येथील पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतीला निधी न दिल्यामुळे सरपंचांची डोकेदुखी वाढली आहे.

Chandrapur
Nashik: जून संपूनही ना ताळमेळ ना नियोजन; प्रशासक काळात बिघडले गणित

ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न कमी आहे. अशातच कोरोना काळात गृहकर वसुली न झाल्याने ग्रामपंचायतीकडे फारसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या कामावरील साहित्य, मजुराचे पेमेंट कुठून करायचा असा प्रश्न सरपंचांसमोर पडला आहे.

Chandrapur
Nagpur : उपजिल्हा रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा?

सीईओ अधिकाऱ्यावर कारवाई करतील काय?

ग्रामपंचायतीचा 60 टक्के निधी जिल्हा परिषदेने पंचायत समितीकडे वळता केल्याने महिन्याभराचा कालावधी लोटला तरी गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला निधी दिला नाही. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देऊन विकासकामांत अडसर ठरणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करतील का, असा सवाल सरपंच करीत आहेत. जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत मंजूर असलेले सीसी रोडचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकाम करण्यासाठी लागलेल्या साहित्याचे पेमेंट, मजुरांचे पेमेंट देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी नाही. बांधकामाचा 60 टक्के निधी पंचायत समिती स्तरावर आहे. मात्र महिनाभराचा कालावधी लोटला तरी पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतीला निधी दिलेला नाही, अशी माहिती जानाळा ग्रामपंचायत ची सरपंच रंजना भोयर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com