Nagpur
NagpurTendernama

'आंबेडकर भवन पाडणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकवा अन्यथा मोर्चा काढणार'

Published on

नागपूर (Nagpur) : अंबाझरी उद्यान परिसरात एका खासगी कंत्राटदाराकडून जमीनदोस्त करण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुन्हा उभारून त्या परिसरात कन्व्हेंन्शन सेंटरसाठी आंबेडकरी अनुयायांनी कंबर कसली आहे. यासाठी डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर(अंबाझरी) बचाव कृती समितीने ठेकेदारांना धडा शिकवण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

Nagpur
नरिमन पॉईंट ते विरार अवघ्या 1 तासात; MMRDA बांधणार 3 नवे सी-लिंक

येत्या  मंगळवारी २० डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये करणार आहेत. ते काँग्रेसचे पदाधिकारी असून कंत्राटदारसुद्धा काँग्रेसच्या प्रदेश समितीवर आहेत.  मनपा, नासुप्र व त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला भाडेपट्ट्यावर दिलेल्या या जागेला खासगी कंत्राटदाराच्या घश्यात टाकण्यात आली.

Nagpur
'समृद्धी'वरून धावणार पहिली ST बस; नागपूर-शिर्डी भाडे तब्बल 1300रु.

राज्य सरकारनेही अवैधपणे या जागेची लीज व भाडेपट्ट्याचा करार केल्याचा आरोप गजभिये यांनी केला. कोट्यावधीची ही जागा खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचे हे षडयंत्र असून, याबाबत करण्यात आलेले करार व हस्तांतरण प्रक्रिया अवैध आहे. या जागेपैकी २०एकर जाग डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी सोडावी व उर्वरित २४ एकर ७ गुंठे जमीन उद्यानासाठी ठेवल्यास विरोध नसल्याची भूमिका आहे. या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी व भवनाच्या निर्माणासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.

Tendernama
www.tendernama.com