9 कोटींचा निधी गेला कुठे?; टेंडर घेऊन अग्निशमन यंत्रांचा पुरवठाच..

Fire Brigade
Fire BrigadeTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : वर्षभरापूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालय, मुंबईतील एका खासगी रुग्णालयांत आगीच्या घटनेत चिमुकल्या मुलांचे तसेच रुग्णांचे होरपळून मृत्यू झाले होते. त्यानंतर राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात फायर ऑडिट झाले. अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र नागपूरच्या मेडिकलमधील अग्निशमन यंत्रणा उभारता लावण्यात आलेले अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाले होते. ही बाब समोर आल्यानंतर टेंडर प्रकाशित झाले. कंत्राटदार नेमला, मात्र कंत्राटदाराने पुरवठाच केला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यामुळे या कंत्राटदारावर आता कारवाईचा बडगा उभारण्यात येणार असल्याच्या हालचालींना वेग आला.

Fire Brigade
मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण; कुठे भेगा, कुठे...

मेडिकल तसेच ट्रॉमा येथील फायर ऑडिटसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ८.९४ कोटींचा निधी मेडिकलच्या खात्यात आला होता. तेथील फायर ऑडिट झाले. मात्र आहे. परंतु मेडिकल परिसरात आग लागल्यानंतर लावण्यात आलेल्या सिजफायर यंत्र मुदतबाह्य झाले आहेत. मेडिकल कॉलेज तसेच रुग्णालयात, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाले आहेत. हे यंत्र बदलण्यासाठी किंवा या असलेला वायू बदलण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. पुरवठादारांनी निविदा भरल्या. एका कंत्राटदाराला कंत्राटही मिळाले. मात्र त्या कंत्राटदाराने अद्याप पुरवठा केला नाही. यामुळे या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निविदेसमयी प्रकाशित नियमात आहे. यामुळे या कंत्राटदारावर लवकरच कारवाई करण्यासंदर्भात मेडिकल प्रशासन विचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. मेडिकलच्या अनेक वॉर्डात अग्निशमन यंत्रावरील 'एक्‍स्पायरी डेट' संपली आहे. वर्षभरात या यंत्राची मुदत असते. पण, या यंत्राची मुदत संपल्यानंतरही हे यंत्र तसेच भिंतीला टांगलेल्या शोभेच्या वस्तू बनतात.

Fire Brigade
फडणवीसांचे उपमुख्यमंत्रिपद नागपूर महापालिकेला पावणार का?

अग्निशमन यंत्र शोभेची वस्तू...
वर्षभरात अग्निशमन यंत्र बदलविणे आवश्‍यक आहे. पण, तसे न करता अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाले आहेत. हे यंत्र शोभेची वस्तू ठरत आहेत. यापूर्वी शॉर्ट सर्किटमुळे मेडिकलमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. दररोज येथे डॉक्‍टर, परिचारिका, निवासी डॉक्‍टरांसहित नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असताना या महत्त्वाच्या यंत्राची तपासणी होत नसून ते बदलण्यात येत नसल्यामुळे मेडिकलच्या ढिसाळ प्रशासनाचा हा उत्तम नमुना असल्याची चर्चा येथे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com