Bhandara : सोंड्याटोला प्रकल्प; ऑपरेटरचे वेतन थकल्याने पाण्याचा उपसा बंद

Bhandara
BhandaraTendernama

भंडारा (Bhandara) : सोंडयाटोला उपसा सिंचन प्रकल्पात कार्यरत ऑपरेटरचे सहा लाख रुपयांचे वेतन थकले आहे. पंपगृह टेंडर कंत्राटदाराने वेतन दिले नाही. यामुळे संतापलेल्या कार्यरत ऑपरेटर यांनी प्रकल्प स्थळात नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद केला आहे. चांदपूर जलाशय ओवर-फ्लोपासून तीन पावले दूर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यातच पाण्याचा उपसा बंद करण्यात आल्याने नदी पात्रातील धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.

Bhandara
Shinde-Fadnavis-Pawar : 9 खासगी कंपन्यांना सरकारी नोकर भरतीचे कंत्राट देण्याचा निर्णय मागे घ्या!

पावसाळ्यात नदी पात्रातून पाण्याचा उपसा केल्यानंतर रब्बी हंगामात रोटेशन पद्धतीने पाणी वितरणाचे नियोजन पाटबंधारे विभागाची यंत्रणा करीत आहे. सॉड्याटोला प्रकल्पात पाटबंधारे विभागाचे नियंत्रण असले तरी संचालन टेंडर कंत्राटदाराचे मार्फत करण्यात येत आहे. वीज, पंप, सुरक्षा रक्षक व अन्य कामे टेंडर कंत्राटदाराचे करवी करण्यात येत आहेत. शासन स्तरावरून कंत्राटदारांना निधी उपलब्ध करण्यात येत आहे. प्रकल्प स्थळात पाणी उपसा करणारा पंपगृह विभाग महत्त्वपूर्ण आहे.

Bhandara
Mumbai : 'त्या' उन्नत मार्गाचे टेंडर 'L&T'ला; कामापूर्वीच बजेट 2000 कोटींनी वाढले

नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी तीन ऑपरेटरची नियुक्ती टेंडर कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांचे मार्फत करण्यात आली आहे. सोंड्या गावातील दोन ऑपरेटर कार्यरत आहेत. जुन्या हिशोबाचे 3 लाख 50 हजार रुपयांचे वेतन देण्यात आले नाही. दुसऱ्या ऑपरेटरचे 2 लाख 75 हजार रुपयांचे वेतनाची थकबाकी असल्याची माहिती मिळाली आहे. तीन महिन्यांचे वेतनही देण्यात आले नाही. चार दिवसांपासून प्रकल्प स्थळात ऑपरेटर संप करणार असल्याची  कुजबुज सुरू झाली होती. दरम्यान,  निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांनी कार्यरत ऑपरेटरची भेट घेऊन समजूत घालण्याचे प्रयत्न केले होते. की संतापलेल्या तिन्ही ऑपरेटरने नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद केला आहे. वेतन प्राप्त करण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. पाण्याचा उपसा बंद करण्यात आल्याने रब्बी हंगामात मिळणाऱ्या पाण्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असून, चिंताही वाढल्या आहेत.

Bhandara
Nagpur : एका पावसाने रस्ता बांधकामाचे पितळ उघडे; अख्खा रस्ताच वाहून गेल्याने दर्जाबाबत...

टेंडर कंत्राटदार हे थकबाकीचे वेतन, नियमित वेतन देण्याचे संदर्भात चार दिवसांपासून आश्वासनाचे गाजर दाखवीत आहेत. वेतन देण्याच्या संदर्भात तोडगा निघाला नाही. यामुळे  सकाळी पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेतन प्राप्तीसाठी बेमुदत संप करण्यात येत आहे. अशी माहिती सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे ऑपरेटर महादेव गौपाले यांनी दिली. पंपगृह बंद करण्यात येत असल्याची माहिती ऑपरेटर यांनी दिली आहे. निविदा कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. निश्चितच ऑपरेटरांना थकबाकीचे वेतन मिळाले पाहिजे. ऑपरेटरच्या वेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढले जाईल. संजय दलाल, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, तुमसर.

नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग : 

बावणथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. पावसाळ्यात तीन महिने प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. प्रकल्पातील पाचही पंप बंद करण्यात आल्याने नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जलाशयाची पाणी साठवणूक क्षमता 33 फूट आहे. दरम्यान, सध्या जलाशयात 33 फूट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. जलाशय ओव्हरफ्लोपासून तीन पावले दूर आहे. ऐन पावसाळ्यात पंप बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com