Chandrapur News : चंद्रपूर झेडपीच्या 'या' शाळांबद्दल आली चांगली बातमी; 30 कोटी खर्चून...

School Students
School StudentsTendernama

Chandrapur News चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये या शाळांचे विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत यासाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आता जिल्ह्यातील 12 शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 30 कोटी 13 लक्ष रुपयांचा खर्च केला जाणार आहे. 

School Students
सरकारच्या नाकावर टिच्चून गावकऱ्यांनी करून दाखवले! येणार तब्बल 6 कोटींचा खर्च

सोबतच विविध गावांतील 101 वर्गखोल्यांचेही बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी 20 लाख 35 हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या शाळांसाठी जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत निधी खर्च केला जाणार आहे. या निधीमुळे जिल्हा परिषद शाळाही इंग्रजी शाळांच्या धर्तीवर हायटेक होणार असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळणार आहे. 

शाळांमध्ये दर्जेदार सुविधा : 

जिल्ह्यातील शाळांमध्ये 102 वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये 20 लाख 35 हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या वर्गखोल्या अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहेत.

School Students
Nashik : राजकीय कुरघोडीमध्ये आयटी पार्कचे झाले खेळणे; जागा बदलाचा तीनदा खेळ

101 वर्गखोल्यांचे होणार बांधकाम : 

खनिज विकास निधीतून वीस कोटी 35 हजार रुपये खर्च करून जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांतील विविध गावांतील 101 वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील आत, भद्रावती तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील तीन, राजुरा तालुक्यातील चार, चिमूरमधील सहा, कोरपना तालुक्यातील पाच, नागभीडमधील चार, पोंभुर्णा तालुक्यातील पाच, जीवतीमधील आठ, सिंदेवाही चार, मावळी पाच, बल्लारपूर तालुक्यातील सहा, गोंडपिपरी तीन, तर ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन गावांतील शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत.

School Students
Pune News : विद्यार्थ्यांना दिलासा; MPSC ने दूर केला संभ्रम; 2025 पासूनच...

चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात जिल्हा परिषद अंतर्गत जटपुरा गेट कन्या शाळा आहे. ही शाळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. मात्र सध्या या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी ज्युबिली हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जटपुरा गेट परिसरातील या शाळेचीही दुरुस्ती करून पुन्हा ही शाळा भरवावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकत्यांकडून सातत्याने केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com