Chandrapur : 'ते' त्रुटी असलेले प्रस्ताव मंजूर; 3,237 कुटुंबांनाही मिळणार हक्काचे घर

चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर जिल्ह्यातील रमाई आवास घरकुल योजनेचे (ग्रामीण) 3 हजार 237 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये त्रुटी असलेल्या 1 हजार 265 घरकुलांच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Chandrapur : 'ते' त्रुटी असलेले प्रस्ताव मंजूर; 3,237 कुटुंबांनाही मिळणार हक्काचे घर
Mhada : म्हाडाचे मोठे दिवाळी गिफ्ट! 'त्या' 38 हजार कुटुंबांना सरसकट मिळणार...

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना सुरू केली आहे. याअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील राहणीमान लोकांचे उंचावणे, त्यांच्या निवान्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागात त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते.

रमाई आवास योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व तालुक्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडून पात्र लाभाथ्र्यांची यादी मंजुरीसाठी मागविण्यात आली होती.

Chandrapur : 'ते' त्रुटी असलेले प्रस्ताव मंजूर; 3,237 कुटुंबांनाही मिळणार हक्काचे घर
Nashik : 'या' डबलडेकर पुलाचा आराखडा तयार करा; दादा भुसेंनी प्रशासनाला लावले कामाला!

बैठकीत निर्णय

रमाई आवास योजनेसाठी 2022-23 या वर्षांत तालुकानिहाय उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये 15 तालुक्यांत एकूण लाभार्थ्यांची संख्या 2 हजार 972 होती. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अनेकांनी योजनेसाठी अर्ज केले. मात्र, हे अर्जदार घरकुलापासून वंचित असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे सुरुवातीला रद्द झालेले 1 हजार 265 लाभार्थी रमाई घरकुल योजनेसाठी नव्याने पात्र ठरले. जिल्हा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची लवकरच अमलबजावणी होणार आहे.

Chandrapur : 'ते' त्रुटी असलेले प्रस्ताव मंजूर; 3,237 कुटुंबांनाही मिळणार हक्काचे घर
Nashik : 1384 ग्रामपंचायतींना लॉटरी; जिल्हा परिषद करणार 6.32 कोटी जमा

रद्द ऐवजी झाले पत्र (तालुकानिहाय घरकुल) : 

मूळ - 191

जिवती - 24

वरोरा - 50

नागभीड - 102

राजुरा - 57

ब्रह्मपुरी - 07

गोंडपिपरी - 261

कोरपना - 54

सावली - 266

पौभुर्णा  - 22

भद्रावती - 39

बल्लारपूर - 89

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com