फडणवीसांनी मंजुरी देऊनही भाजप अध्यक्ष बावनकुळेंनीच लावला ब्रेक

Chandrashekhar Bawankul, Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankul, Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : काँग्रेसचे आमदार राजू पारवे (Raju Parve) यांच्या उमरेड विधानसभा मतदारसंघातील डीपीसीतील कामे करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परवानगी दिली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अधिकाऱ्यांना तोंडी आदेश देऊन कामे रोखल्याची चर्चा आहे.

Chandrashekhar Bawankul, Devendra Fadnavis
मोठी बातमी! महापालिका, नगरपरिषदांत 40 हजार भरती; बांधकामासाठीही...

राज्यात शिंदे सेना-भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व जिल्हा नियोजन समितीच्या कामांना ब्रेक लावण्यात आले होते. नंतर सरकारने कामांवरील स्थगिती उठवत मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले. परंतु कामांना मंजुरी मिळत नसल्याने विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. स्थगिती उठविण्यासंदर्भातला विषय हिवाळी अधिवेशनातही गाजला होता. हा विषय गाजत असतानाच उमरेड विधानसभा मतदार संघातील कामांवरील स्थगिती उठविण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमधील जिल्हा परिषदेशी संबंधित कामांचा यात समावेश आहे.

Chandrashekhar Bawankul, Devendra Fadnavis
नागपूर जिल्हा परिषदेतील दोन कोटींच्या फाईल कशासाठी रोखल्या?

मिळालेल्या माहितीनुसार नावीन्यपूर्ण योजना, रस्ते, जनसुविधा व नागरिसुविधांचा यात समावेश आहे. उमरेड विधानसभा मतदार संघातून राजू पारवे आमदार असून ते कॉंग्रेसचे आहे. सत्ताधारी पक्षात भाजप व शिंदे सेना सहभागी आहे. जिल्‍ह्यात दोघांचे मिळून तीन आमदार आहे. परंतु त्यांच्‍या मतदार संघातील कामांवरील स्थगिती कायम असून कॉंग्रेस आमदाराच्या मतदार संघातील कामांस मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Chandrashekhar Bawankul, Devendra Fadnavis
मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 15 मिनिटांत; नोव्हेंबरचा मुहूर्तही ठरला

तर दुसरीकडे राजू पारवे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहणार असून त्यांनी पराभूत केलेले सुधीर पावरे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजू पारवेंच्या मतदार संघातील कामांवरील स्थगिती उठविल्याने भाजपमधील नेत्यांमध्ये  नाराजीची सूर आहे. एक बड्या नेत्याने या सूटला उघडपणे विरोध केला आहे. एक प्रकारे पालकमत्र्यांनाच आव्हान देण्यात येत असल्याची चर्चा पक्षात रंगू लागली आहे. तर यामुळे भाजप नेत्यांमधील वर्चस्वाची लढाई उघड झाल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com