Bhandara : ग्रामपंचायतीचे 51 लाख लाटले; सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्याला पोलिसांचा दणका

Court
CourtTendernama

भंडारा (Bhandra) : सरकारच्या विविध विकास योजनांतर्गत ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या निधीची बनावट कागदपत्रे तयार करून 51 लाख 14 हजार रुपयाच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी गणेशपूर येथील माजी सरपंचासह तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याला भंडारा पोलिसांनी अटक केली.

Court
Nagpur : अजून होणार पाणीटंचाई कारण कामे अडकली आचारसंहितेत

दोघांनाही भंडारा न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे आणि माजी सरपंच मनीष गणवीर अशी पोलिस कोठडी ठोठावल्यांची नावे आहेत.

बीडीओंच्या चौकशी अहवालात अपहार केल्याची बाब स्पष्ट झाल्याने बीडीओंनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या दोघांवरही भादंविच्या कलम 409, 420, 465, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भंडाराचे बीडीओ संघमित्रा कोल्हे यांच्या चौकशी अहवालानुसार, ग्रामविकास अधिकारी श्याम विलवणे आणि माजी सरपंच मनीष गणवीर यांच्या कार्यकाळामध्ये 5 मे 2021 ते 1 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सरकारने विविध विकासकामांच्या योजना राबविण्यासाठी गणेशपूर ग्रामपंचायतीला निधी दिला होता.

मात्र, तो विकासकामांसाठी वापरण्याऐवजी या दोघांनीही वैयक्तिक फायद्यासाठी वापरला, त्यासाठी टप्याटप्प्याने बनावट कागदपत्रे तयार करून ती जोडली. या माध्यमातून त्यांनी 51 लाख 14 हजार 500 रुपयांचा गैरप्रकार केल्याचे पुढे आले होते.

Court
Nashik : नाशिक जिल्ह्यात 'या' योजनेद्वारे 1,073 उद्योगांत 50 कोटींची गुंतवणूक

भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात हा गैरप्रकार स्पष्ट झाल्याने त्यांनी भंडारा पोलिसांत लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी चौकशी अहवालामध्ये विद्यमान सरपंचावरही ठपका ठेवण्यात आला होता, यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मंगळवारला बिलवणे व गणवीर यांना अटक करण्यात आली.

गणेशपूर ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे आणि माजी सरपंच मनीष गणवीर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांनाही 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती भंडाराचे प्र. पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com