Good News : 792 कोटीत नागपुरात होणार आणखी नवे पाच उड्डाणपूल

bridge
bridgeTendernama

नागपूर (Nagpur) : शहरात आणखी पाच नव्या उड्डाणपूलांची भर पडणार आहे. या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडी फुटणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या - नगरविकास विभागाने 792कोटी रुपये मंजूर केले आहेत.

bridge
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 'या' प्रकल्पाला कॅबिनेटचा ग्रीन सिग्नल! 'महाप्रित' करणार...

शहरात गेल्या काही वर्षांत अनेक उड्डाणपूल तयार झाले आहेत. इंदोरा ते थेट सक्करदरा उड्डाणपूलांचे काम सुरू आहेत. आता आणखी पाच नवे उड्डाणपूल तयार होणार आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दक्षिण, पूर्व व मध्य नागपुरातील शहरात आणखी नवे पाच उड्डाणपूल रस्त्यांवर उड्डाणपूलाची गरज व्यक्त करीत नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. महारेलने पाच उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार केला होता. गडकरी, फडणवीस यांच्यापुढे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी या सादरीकरण केले होते. राज्य सरकारने मंजुरी दिली असून, महारेल कंपनी बांधकाम करणार आहे. या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

bridge
Nagpur : ग्लोबल टेंडर प्रक्रिया सुरू; महापालिकेत येणार 70 मीटर उंच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म

पूर्व मध्य व दक्षिण नागपुरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी बघता या उड्डाणपूलाच्या आवश्यकतेकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. या उड्डाणपूलाच्या सादरीकरणानंतर दोन्ही नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उड्डाणपुलांना मान्यता दिली असून, नगरविकास विभागाने 792 कोटी रुपये मंजूर केले. अशी माहिती आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली.

वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण :

ज्या मार्गावर सध्या पाच उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत, तेथे सातत्याने रहदारी असते व वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण होतात. विशेषतः रेशीमबाग ते कडीके कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भाडेप्लॉट, चंद्रशेखर आझाद चौक, वर्धमाननगर इत्यादी भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोडी असते. उड्डाणपुलांचे काम सुरू झाल्यावर त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी लोकप्रतिनिधीनी आग्रह धरायला हवा, अशी नागरिकांची भावना आहे.

bridge
Mumbai Pune : धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; आता 'या' उपाययोजनांची सक्ती

या मार्गांवर होणार उड्डाणपूल : 

274 कोटी - वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड, 

251 कोटी - रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट, 135 कोटी - लकडगंज पो.स्टे. ते वर्धमाननगर, 66 कोटी- चंद्रशेखर आझाद चौक- गंगाजमुना ते मारवाडी चौक, 66 कोटी नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com