Yavatmal : पावसाळा सुरु झाला तरी 3 हजारांवर घरकुलाचे बांधकाम ठप्प

Gharkul Yojana
Gharkul YojanaTendernama
Published on

यवतमाळ (Yavatmal) : 2024 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यासाठी राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काची घरे देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना शासन राबवत आहे. मात्र, निवडणूक आचारसंहिता व विविध कारणे सांगून अनुदानाचे हप्ते थकल्याने घरकुल लाभार्थी ऐन पावसाळ्यात अडचणीत सापडले आहेत.

Gharkul Yojana
Mumbai : महापालिकेचा डंका; 100 किलोमीटर जलबोगदे असणारे जगात दुसरे शहर

मंजूर अनुदान कमी आणि बांधकाम साहित्याचे वाढलेले दर यामुळे आतापर्यंत तीन हजाराचे वर घरकुल बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याचे धक्कादायक चित्र तालुक्यात आहे. खुला, अनुसूचित जाती, जमाती, आदिम जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजनेतून घरकुल दिले जात आहे. परंतु, घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान कमी आहे. बहुतांश घरकुल योजनेमध्ये अनुदान एक लाख वीस हजार तर पीएम जनमन योजनेत हे अनुदान अडीच लाख रुपये एवढे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल अनुदानाच्या रकमेत सरकारने वाढ केली नाही. त्या तुलनेत बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एवढ्या अल्प रकमेत घर कसे बांधावे, असा प्रश्न लाभार्थ्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांकडून घरकुल अनुदानाचा पहिला हप्ता उचलला जातो. मात्र, तेवढ्या पैशांत ठरवून दिलेले काम पूर्ण होत नसल्याने घर बांधकाम त्याच ठिकाणी थांबल्या जाते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'सर्वांसाठी घर' देण्याचे स्वप्न भंगणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Gharkul Yojana
Nagpur : विविध प्रकल्पांच्या कामांना गती; आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी

मारेगाव तालुक्यात 2016-17 ते 2023-24 दरम्यान रमाई आवास योजनेची 401, शबरी घरकुल योजनेची 898, प्रधानमंत्री घरकुल योजनेची 1 हजार 29, मोदी आवास योजनेची 1677, पीएम जनमत 831, आदी जमात 520 घरे मंजूर झाली. त्यापैकी एक हजार 429 घरांचे बांधकाम पूर्ण झाले तर यावर्षी मंजूर झालेल्या काही घरांची कामे प्रगतीवर असल्याची माहिती देण्यात आली तर तालुक्यात शासकीय रेती घाट उशिराने सुरू झाल्यामुळे बांधकामे थांबली होती. आता घरकुलधारकांना रेतीचे पास मिळत असून हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास रेती काढण्यास परवानगी देण्याबाबतचे सरकारने परिपत्रक काढले. मात्र, तालुक्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. घरकुल बांधकामासाठी शासनाचे अनुदान कमी पडत असल्याची ओरड होत असली तरी यावर्षी नव्याने मंजूर झालेल्या बहुतांश घरकुलाचे काम प्रगतिपथावर आहे. काही लाभार्थ्यांच्या वैयक्तिक कारणाने काही घरकुलांची कामे थांबली आहेत. ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया सुधाकर जाधव, विस्तार अधिकारी, घरकुल पंचायत समिती मारेगाव यांनी दिली.

अनेकांचे स्वप्न अधुरे : 

आपले स्वतःचे घर असावे, असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो, अनेकवेळा उसनवारीने पैसा काढून बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करतो. परंतु, घर मंजूर असतानाही एवढया अल्प पैशांत घर कसे बांधावे, हा मोठा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com