Nagpur : काटोलमधील 30 कोटींच्या रस्ता प्रकल्पाला मिळाली मंजुरी

Road
RoadTendernama

नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत काटोल नगरपरिषद रस्ते विकास प्रकल्पाकरिता राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने 30.38 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे. मंजुरीचे आदेश महाराष्ट्र सरकार उपसचिव श्रीकांत आंडगे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.

Road
Nagpur : जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बनविण्यासाठी पुनर्विकासाचे काम जोरात; आतापर्यंत एवढे कोटी खर्च

प्रशासकीय काळ सुरू असतानाही एवढा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष चरणसिंह ठाकूर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या प्रकल्पाअंतर्गत शहरातील आठ रस्ते चकाकणार आहेत. शहरातील काटोल-नागपूर मुख्य मार्ग पेट्रोल पंपकडून ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गासह इतर काही भागातील मार्गांची दुर्दशा झाल्याने या रस्त्यांचे नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यासाठी चरणसिंह ठाकूर यांनी सतत पाठपुरावा केला होता.

Road
नितिन गडकरी म्हणाले, रस्त्यावर खड्डे पडले तर ठेकेदारांना बुलडोजरच्या खाली टाकू

या मंजूर झालेल्या प्रकल्पाअंतर्गत गळपुरा चौक ते नागपूर रोडवरील उड्डाणपूलपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, गळपुरा चौकातील पशुसंवर्धन हॉस्पिटल ते रेल्वे ट्रॅकपर्यंत रस्त्याचे बळकटीकरण, स्विमिंग पूल समोरील रस्त्याचे बळकटीकरण, मुंधडा पेट्रोल पंप ते आरघोडे चौक रस्त्याचे बळकटीकरण, भारत लखोटे यांच्या घरापासून ते आरघोडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे या बळकटीकरण, हनुमान मंदिर ते महाजन यांचे घरापर्यंतच्या रस्त्याचे ते बळकटीकरण, कृऊबास ते काळबांडे  यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता व काटोल-नागपूरमार्गे रस्ता होणे महत्त्वाचे होते. आता हे रस्ते चकाकणार आहेत. त्याबद्दल आनंदच आहे. अशी प्रतिक्रिया नागरिक भूषण भोयर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com