Nashik Infra Boost: रेल्वेकडून नाशिक जिल्ह्याला काय मिळणार गुड न्यूज?

येवला येथील तीन रेल्वे क्रॉसिंगवर ROB; ₹136.79 कोटी निधी मंजूर; मध्य रेल्वेकडून 2026-27 योजनेतून निधी
Nashik Railway Infra Boost
Nashik Railway Infra BoostTendernama
Published on

मुंबई (Mumbai): येवला तालुक्यातील गेट क्रमांक ७७, ७६ आणि ७४ येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यासाठी ₹136.79 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nashik Railway Infra Boost
नाशिक ZP सोलर घोटाळा : अंदाजपत्रक ‘कॉपी-पेस्ट’, तांत्रिक मान्यता नियमबाह्य

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील महत्त्वाच्या तीन रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल (ROB) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेट क्रमांक ७७, ७६ आणि ७४ या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी मध्य रेल्वेकडून 2026-27 मधील सीओआरएसपी (CORSP) अंब्रेला योजनेतून ₹136.79 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रालयात मंत्री Chhagan Bhujbal यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendrasinhraje Bhosale तसेच मध्य रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Nashik Railway Infra Boost
नाशिक ZP सोलर घोटाळ्यात नवा ट्विस्ट; बांधकाम विभागात बॅकडेटिंगने नियमांना वळसा

येवला तालुक्यातील दौंड–मनमाड मध्य रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे 100 मेल, एक्सप्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक होते. त्यामुळे संबंधित रेल्वे फाटकांवर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा परिणाम स्थानिक शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवाशांवर होत असून वेळ आणि इंधनाचा अपव्यय वाढत आहे.

नगरसुल (NSL) हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून तेथे येणारे साईभक्त नांदगाव–नगरसुल–येवला या राज्य मार्गाद्वारे गेट क्रमांक ७७ मार्गे शिर्डीकडे प्रवास करतात. मात्र या ठिकाणी होणाऱ्या कोंडीमुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर तिन्ही ठिकाणी उड्डाणपूल उभारणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

Nashik Railway Infra Boost
कोपरगाव-मालेगाव मार्गावर येवल्यात उड्डाणपूल नको; बायपास करा

मध्य रेल्वेच्या रस्ते सुरक्षा आणि पूल बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विनोद भांगळे यांनी या प्रकल्पांचे आराखडे आणि रेखाचित्रे तयार झाल्याची माहिती दिली. जून महिन्यात निधी उपलब्ध करून कामांना प्राधान्याने सुरुवात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादन आणि इतर कामांसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे सांगितले.

या प्रकल्पांमुळे येवला परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

Nashik Railway Infra Boost
Mumbai: मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचा वेग वाढणार

कोंडी फूटणार...

  • येवला येथे 3 ROB प्रकल्प मंजूर

  • ₹136.79 कोटी निधी मंजूर

  • 100+ ट्रेनमुळे कोंडी

  • शिर्डी मार्गावरील प्रवास सुलभ होणार

  • जूनपासून कामांना गती

Tendernama
www.tendernama.com