Nashik: त्र्यंबकेश्वर - नाशिक दिंडीमार्ग का बारगळला? आता फक्त सहापदरी रस्ताच होणार

Dindi Marg Nashik Trimbakeshwar Road: आता काय झाला निर्णय?
Nashik Trimbakeshwar Road
Nashik Trimbakeshwar RoadTendernama
Published on

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सहापदरी रस्ता तयार करताना दोन्ही बाजूंनी पादचारी मार्गाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत. मात्र, दिंडी मार्गासाठी भूसंपादन करावे लागणार असून भूसंपादनाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने त्यात रस्ता उभारणीला उशीर होण्याची शक्यता आहे.

हा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आधी सहापदरी काँक्रिटीकरण रस्ता तयार करण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दिंडी मार्गाचे बघू अशी भूमिका घेतली आहे. यामुळे कुंभमेळा प्राधिकरणाने या रस्त्याच्या कामात पादचारी (दिंडी) मार्गाचा समावेश करण्याची सूचना तूर्त मागे पडली आहे. 

Nashik Trimbakeshwar Road
नाशिक मुंबई लोकल प्रवासाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. या दोन शहरांना जोडण्यासाठी सध्या चारपदरी राज्यमार्ग आहे. त्यातच वाढवण बंदरामुळे भविष्यात नाशिकहून जाणारी वाहतूकही याच मार्गाने जाणार असल्यामुळे राज्य सरकारने या नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २० किलोमीटर मार्गाचा सहापदरी काँक्रिट रस्ता उभारण्यासाठी अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यारंभ आदेशही दिले आहेत.

दरम्यान या कामाची सुरुवात करण्यापूर्वी नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) या रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५० मीटर जागा अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अनेक व्यापारी व निवासी इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या. याविरोधात उपोषण आंदोलन करण्यात आले. आमच्या स्वमालकीच्या जागा असून त्यांना अतिक्रमण म्हणू नये, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे.

Nashik Trimbakeshwar Road
Nashik: नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन सुरू

आमच्या जमिनी घेण्याच्या बदल्यात आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. सरकारनेही भरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या जागा खरेदीत वेळ जाणार असून तोपर्यंत थांबलो, तर सहा पदरी काँक्रिटचा रस्ता वेळेत उभारणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादन होईल तेव्हा होईल, आधी सहा पदरी रस्ता उभारण्याचे काम करून घेऊ, असे ठरवले आहे.

दरम्यान कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्र्यंबकेश्वर ते नाशिक महापालिका हद्द हा २० किलोमीटर मार्गावर पादचारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता आराखड्यात पादचारी मार्गाचा समावेश करण्याच्या सूचनाही दिला. मात्र, आता सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम जवळपास सुरू असून त्या कामात पादचारी मार्गाचा नव्याने समावेश करण्यात वेळ जाण्याची शक्यता आहे.

Nashik Trimbakeshwar Road
नाशिक - त्र्यंबकेश्वर दरम्यान होणार 20 किमीचा दिंडी मार्ग

पुन्हा नव्याने मान्यता घेणे, निधीसाठी तरतूद करणे, टेंडर प्रक्रिया राबवणे, यात बराच कालावधी जाणार असल्याचे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यारंभ आदेश दिलेल्या सहा पदरी रस्त्याचे काम ३१ मार्च २०२७ पूर्वी करण्यावर भर दिला आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिंडीमार्गाचे बघता येईल, आधी सहा पदरी मार्गाचे काम करू, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे.

या मार्गावरून दिंडी सोहळा जाईल, त्यावेळी या सहा पदरी मार्गावरील एक पदरी मार्ग दिंडीसाठी खुला करून देता येईल. यामुळे दिंडीमार्ग सिंहस्थापूर्वीच झाला पाहिजे, याची आवश्यकता नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com