Nashik : 'स्मार्ट रोड'ची वाट लागल्यानंतर आता 25 कोटीचा 'मॉडेल रोड'

Smart City Nashik
Smart City NashikTendernama

नाशिक (Nashik) : महापालिकेने (NMC) पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात (Budget) रस्ते बांधकामासाठी १८५ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या निथीतून कॉलेज रोडच्या धर्तीवर सीबीएस ते कॅनडा कॉर्नर मार्गाचा मॉडेल रोड (Model Road) म्हणून विकास केला जाणार आहे. त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा रस्ता कॉंक्रिटीकरणाचा होणार असून त्याचे सुशोभीकरणही केले जाणार आहे.

Smart City Nashik
Good News : जुनी पेंशन लागू करण्याबाबत केंद्राची मोठी घोषणा

दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने यापूर्वीच अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यान उभारलेल्या स्मार्ट रोडमध्ये काहीही स्मार्टपणा उरलेला नसल्याने तो टीकेचा विषय झालेला आहे. आता हा मॉडेल रस्ता उभारताना त्याची पुनरावृत्ती व्हायला नको, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Smart City Nashik
Nashik ZP : 'जलजीवन'च्या 185 योजनांचे घोंगडे अडकले कुठे?

महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे दोन हजार ४७७ कोटींचे अंदाजपत्रक नुकतेच सादर केले. त्यात जवळपास १६८७ कोटी रुपयांचा महसुली खर्च व ७०१ कोटी रुपये भांडवली खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. अंदाजपत्रकामध्ये शहरात नवीन रस्ते उभारण्यासाठी जवळपास १८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार २९९ कोटी रुपये बांधकाम, विद्युत, उद्यान व मलनिस्सारणविभागासाठी खर्च केले जाणार आहेत. माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार १८५ कोटींच्या रस्त्यांच्या नवीन कामांचा समावेश आहे. महापालिकेने अंदाजपत्रकामध्ये १८५ कोटींच्या निधीतून कोणत्या रस्त्यांची कामे केली जाणार याचीही माहिती दिलेली आहे. या यादीनुसार रस्त्यांची कामे करताना शरणपूर रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.

Smart City Nashik
Thane : खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी पालिका खर्च करणार 25 कोटी

सध्या रस्ता सुस्थितीत असला तरी मॉडल रस्ता म्हणून तो विकसित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कॉलेज रोड प्रमाणे हा रस्ता तयार होईल. सीबीएस ते शरणपूर रोड सिग्नल तेथून पुढे कुलकर्णी गार्डन, कॅनडा कॉर्नर सिग्नलपर्यंत त्यापुढे उजव्या हाताने गंगापूर नाका सिग्नलपर्यंत असा सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार होईल.

अंदाजपत्रकामध्ये २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, दोन कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च केले जाणार आहेत. दरम्यान शहरातील पहिल्या स्मार्ट रस्त्याचे काहीही स्मार्टपण उरलेले नाही. सायकल ट्रॅकचा उपयोग वाहनतळ म्हणून केला जात आहे. अनेक ठिकाणी खोदकाम करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे.

तसेच या रस्त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी केलेल्या गोष्टी जागेवर दिसत नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे इस्टिमेटचे आकडे फुगवण्यासाठी स्मार्ट रोड, मॉडेल रोड, अशी नावे दिली जात असल्याची टीका होत असते.

अंदाजपत्रकातील प्रस्तावित प्रमुख रस्ते
पेठ रोडवरील तवली फाटा ते पेठफाटा (सात कोटी रुपये)
सिडको विभागातील गरवारे पॉइंट ते एक्स्लो पॉइंट ते पपया नर्सरी (४० कोटी)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com