सातपूर आयटीआयमध्ये पुढील वर्षी सुरु होणार 'हे' नवे ३५ अभ्यासक्रम

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : येथील सातपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कौशल्य विद्यापीठाचे केंद्र उभारले जाणार आहे. नवीन नवीन शैक्षणिक धोरणानुसार या कौशल्या विद्यापीठाच्या केंद्रामध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपयुक्त अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

Nashik
चेंबूर येथील भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सर्वेक्षण: देसाई

कौशल्या विद्यापीठाच्या विभागीय केंद्रासाठी जागेची पाहणी करण्यासाठी कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर नाशिक येथे आल्या होत्या. कौशल्य विद्यापीठाच्या धोरणानुसार प्रत्येक विभागात एक केंद्र सुरू केले जाणा आहे. डॉ. अपूर्वा पालकर यांनी जागेची पाहणी आणि शिक्षण, प्रशिक्षण व उद्योग क्षेत्रातील काही नामांकित व्यक्तीसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी कौशल्य विद्यापीठाच्या केंद्राबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून ३५ नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. पुढील शैक्षणिक वर्षात जुलैपासून या अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे.

Nashik
अजित पवारांच्या निशाण्यावर शिंदेचे मंत्री; कंपनीला दिला आर्थिक लाभ

कौशल्य विद्यापीठाने सुरुवातीला पाच पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केले आहेत. यात उद्योग विश्वाला पूरक उपयुक्त ठरू शकेल, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. पदवीसाठी प्रत्येक अभ्यासक्रमास ६० जणांची प्रवेश क्षमता असेल. केवळ कुशल कामगार नव्हे, तर उद्योजक घडवण्याच्या विचाराने अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत, असे कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कौशल्य विद्यापीठाने पर्सिस्टंट सीस्टिम कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून यात करिअरमध्ये एक ते पाच वर्षांचा खंड पडलेल्या महिलांना संधी देण्यात आली आहे. इंजिनियर महिलांना याचा लाभ झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

असे असणार कौशल्य विद्यापीठ
-
विद्यापीठाकडून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांची आखणी केली असून अभ्यासक्रमात ६० टक्के प्रशिक्षणावर भर आहे.
- एक वर्षांचा प्रमाणपत्र, दोन वर्षांचा पदविका, तीन वर्षांचा प्रगत पदविका व चार वर्षांचा वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असणा आहे.
- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्वानुसारच अभ्यासक्रमांची रचना.
उद्योग क्षेत्राच्या अपेक्षेनुसारच अभ्यासक्रमांची आणखी विद्यापीठासह नामांकित संशोधन संस्थांच्या प्रतिनिधींकडून प्रशिक्षण
- पुरेशी संसाधने असलेल्या संस्थांना विद्यापीठासोबत ग्रामीण भागात कोर्स सुरू करण्याची संधी
 उद्योगांच्या अपेक्षा आणि मागणीनुसार देखील अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com