सिंहस्थाची 25 टक्के कामे अजून कागदावरच; 342 पैकी 86 कामांना अद्याप सुरवातच नाही

सिंहस्थाची ८६ कामे टेंडर-वर्क ऑर्डरच्या टप्प्यात; ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान
सिंहस्थाची ८६ कामे टेंडर-वर्क ऑर्डरच्या टप्प्यात; ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान
सिंहस्थाची 25 टक्के कामे अजून कागदावरच Nashik Kumbh MelaTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध विभागांच्या ३४२ प्रकल्पांपैकी २५६ कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. मात्र, तब्बल ७६ कामे अद्याप टेंडर प्रक्रियेत किंवा प्रलंबित आहेत, तर आणखी १० कामांच्या वर्क ऑर्डर बाकी आहेत. त्यामुळे एकूण ८६ कामे अद्याप प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यावर आलेली नाहीत. ही संख्या एकूण प्रकल्पांच्या सुमारे २५ टक्के आहे. सिंहस्थाच्या कामांची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत असल्याने या कामांना कार्यारंभ आदेश कधी मिळणार आणि त्यानंतर ती मुदतीत कशी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिंहस्थाची ८६ कामे टेंडर-वर्क ऑर्डरच्या टप्प्यात; ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी काकोडकर समितीने जनसुनावणी घ्यावी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध विभागांच्या ३४२ प्रकल्पांपैकी २५६ कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. मात्र, तब्बल ७६ कामे अद्याप टेंडर प्रक्रियेत किंवा प्रलंबित असून, आणखी १० कामांच्या वर्क ऑर्डर बाकी आहेत. त्यामुळे एकूण ८६ कामे अद्याप प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यावर आलेली नाहीत. विशेष म्हणजे, ही संख्या एकूण प्रकल्पांच्या २५ टक्के आहे. विशेष म्हणजे सिंहस्थ कामाची मुदत ही ३१ मार्च २०२७ पर्यंत असून आता या कामांना कार्यारंभ आदेश कधी दिले जाणार व त्यानंतर ही कामे मुदतीत, कशी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील आढावा घेण्यात आला. या अहवालात १९ विभागांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या ३४२ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यापैकी २५६ प्रकल्पांचे काम सुरू झाले असून, हे प्रमाण ७५ टक्के आहे. त्यातील  टेंडर अथवा वर्क ऑर्डरच्या टप्प्यावर प्रलंबित सर्वाधिक कामे पोलिस विभाग ग्रामीण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत. पोलिस विभाग ग्रामीणची १८ कामे टेंडर प्रक्रियेत प्रलंबित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची ११ कामे, मध्य रेल्वेची आठ, शहर पोलिसांची आठ आणि नाशिक महापालिकेची सात कामे या टप्प्यावर आहेत.
 

सिंहस्थाची ८६ कामे टेंडर-वर्क ऑर्डरच्या टप्प्यात; ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान
समृद्धी महामार्गालगतच्या 292 गावांसाठी विकास आराखडा; एमएसआरडीसीकडून सल्लागाराची नियुक्ती

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५८ प्रकल्पांपैकी ४६ कामे सुरू झाली असून, ११ कामे टेंडर प्रक्रियेत आहेत आणि एका कामाची वर्क ऑर्डर बाकी आहे. नाशिक महापालिकेच्या ५३ प्रकल्पांपैकी ४५ कामे सुरू आहेत; सात कामे टेंडर प्रक्रियेत असून एका कामाची वर्क ऑर्डर प्रलंबित आहे. मध्य रेल्वेच्या १३ कामांपैकी केवळ एक काम सुरू झाले असून आठ कामे टेंडर प्रक्रियेत आणि चार कामे वर्क ऑर्डरच्या प्रतीक्षेत आहेत.

महावितरण कंपनीच्या २५ प्रकल्पांपैकी २१ कामे सुरू झाली असून चार कामे टेंडर प्रक्रियेत आहेत. जिल्हा परिषदेची २१ पैकी १८ कामे, एसटी महामंडळाची आठपैकी सात कामे आणि शिर्डी नगरपरिषदेची १८ पैकी १७ कामे सुरू झाली आहेत. दुसरीकडे, त्र्यंबक नगरपरिषदेची सर्व ३० कामे अद्याप प्रलंबित श्रेणीत आहेत, असे अहवालातील तक्त्यावरून दिसते.

सिंहस्थाची ८६ कामे टेंडर-वर्क ऑर्डरच्या टप्प्यात; ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान
नाशिक महापालिकेतील 25 कोटींच्या टीडीआर प्रकरणाची चौकशी; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

सिंहस्थासाठी मंजूर झालेल्या कामांच्या अंमलबजावणीला वेग देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. विशेषतः टेंडर आणि वर्क ऑर्डरच्या टप्प्यावर असलेल्या ८६ कामांना प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यावर आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ३४२ कामांचे ट्रॅकिंग सुरू असून, त्यापैकी ७५ टक्के कामे सुरू झाल्याचे अहवालातून स्पष्ट होते.
(समाप्त)

सिंहस्थाची ८६ कामे टेंडर-वर्क ऑर्डरच्या टप्प्यात; ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान
Nashik Ring Road Land Scam: नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी

Key Points

  • सिंहस्थासाठी मंजूर ३४२ प्रकल्पांपैकी २५६ कामे प्रत्यक्ष सुरू

  • ७६ कामे टेंडर प्रक्रियेत किंवा प्रलंबित

  • आणखी १० कामांच्या वर्क ऑर्डर बाकी

  • एकूण ८६ कामे अद्याप प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यावर नाहीत

  • प्रलंबित कामांची संख्या एकूण प्रकल्पांच्या सुमारे २५ टक्के

  • सार्वजनिक बांधकाम विभागाची १२ कामे टेंडर किंवा वर्क ऑर्डरच्या टप्प्यावर

  • मध्य रेल्वेच्या १३ कामांपैकी केवळ एक काम सुरू

  • नाशिक महापालिकेची सात कामे टेंडर प्रक्रियेत, एका कामाची वर्क ऑर्डर बाकी

  • त्र्यंबक नगरपरिषदेची सर्व ३० कामे प्रलंबित श्रेणीत

  • ३१ मार्च २०२७पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान

Tendernama
www.tendernama.com