नाशिक महापालिकेची नोकरभरती आचारसंहितेत अडकली

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून, नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचा परिणाम जिल्हा वार्षिक योजनेतील निधी नियोजनावर व निधी खर्चावर झाला असून, सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यातच या आचारसंहितेचा नाशिक महापालिकेतील आरोग्य व अग्निशमन दलातील ७०६ पदांच्या नोकरभरतीची प्रक्रियेलाही फटका बसला आहे. नाशिक महापालिकेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी परीक्षा पद्धत राबवणाऱ्या आयबीपीएस कंपनीसोबतचा सामजंस्य करार आचारसंहितेमुळे करता येणार नसल्याने ही संपूर्ण भरती प्रक्रियाच महिनाभर थांबणार आहे. यामुळे या दोन विभागांच्या भरती प्रक्रियेबाबत फेब्रुवारी महिन्यातच सामंजस्य करार होऊ शकणार आहे.

Nashik Municipal Corporation
शिंदे गटाच्या दादा भुसेंनी फिरविला शब्द; ४६१ पैकी १० गावांनाच...

नाशिक महापालिकेतील नोकरभरती अनेक वर्षांपासून वाढता आस्थापना खर्च, सुधारित आकृतिबंध आणि सेवा प्रवेश नियमावलीच्या अडथळ्यांमुळे रखडली आहे. रिक्त पदांची संख्या २८०० वर गेल्याने पालिकेच्या प्रशासकीय यांना कामकाज करणे अडचणीचे होत आहे. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व अग्निशमन या अत्यावश्यक सेवेशी संबंधित विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली. मात्र, सेवा प्रवेश नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकरभरतीची प्रक्रिया रखडली होती. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व आरोग्य विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेसाठी परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थांची नियुक्ती केली जाणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले होते.

Nashik Municipal Corporation
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

दरम्यान, राज्य सरकारच्या निश्‍चित केलल्या आयबीपीएस आणि टीसीएस या दोन संस्थांपैकी महापालिकेने आयबीपीएस या संस्थेची भरतीसाठी परीक्षा घेण्यासाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने विविध पदांच्या भरतीसाठी अर्जनिहाय आकारण्यात येणाऱ्या शुल्क निश्चितीसह तसेच अर्जस्वीकृती, मुलाखती, लेखी परीक्षा आणि नियुक्तीपत्र देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस समवेत सामंजस्य कराराची तयारी सुरू केली होती. या संस्थेसोबत सामंजस्य करार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे निश्‍चित करण्यात आले असतानाच डिसेंबरच्या अखेरीस विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे साधारणपणे महिनाभर सामंजस्य कराराची प्रक्रिया लांबली आहे. यामुळे एकूणच महापालिकेची भरती प्रक्रिया एक महिना उशीराने होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com